Fri, Apr 26, 2019 15:41होमपेज › Aurangabad › थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनचा धिंगाणा, सहा जण जखमी

थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनचा धिंगाणा, सहा जण जखमी

Published On: Jan 02 2018 12:58AM | Last Updated: Jan 02 2018 12:30AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनचा शहरात विविध ठिकाणी चांगलाच धिंगाणा झाला. अंदाजे हजार ते दीड हजार पोलिस रस्त्यावर उतरून विविध चौकांत बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यानंतरही अपघात आणि मारहाणीच्या किरकोळ घटनांमध्ये सहा जण जखमी झाले. याची घाटी चौकीत नोंद असून जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

आनंद मुकुंद वाकळे (21, रा. हमालवाडा, रेल्वे स्टेशन) याला घराजवळच काही तरुणांनी मारहाण केली. यात तो किरकोळ जखमी झाला. त्याला घाटीत दाखल करण्यात आले. याची नोंद सातारा ठाण्यात करण्यात आली. दुसरी घटना घाटी क्‍वॉर्टरजवळ घडली. यात श्रीराम अपसिंग घुसिंगे (23, रा. एन-12, टीव्ही सेंटर) हा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बेगमपुरा ठाण्यात नोंद करण्यात आली. तिसर्‍या मारहाणीच्या घटनेत अश्‍विन उत्तमसिंग जोशी (24, रा. म्हाडा कॉलनी, बाबा पेट्रोलपंप चौक) हा जखमी असून त्याला जमावाने मारहाण केली.

या प्रकरणी क्रांती चौक ठाण्यात नोंद करण्यात आली. याशिवाय किरकोळ अपघाताच्या तीन घटना घडल्या. जाधववाडीजवळ झालेल्या दुचाकीच्या अपघातात गणेश नंदू देवकर (25, रा. पिसादेवी रोड) हा जखमी झाला. त्याच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. नितीन कीर्तीकर (30, रा. फतियाबाद) याचा जांभाळा गावात अपघात झाला असून तो जखमी आहे. याची नोंद दौलताबाद ठाण्यात करण्यात आली आहे. राजेश लाहोट (41, रा. हर्षनगर) याचा पहाटे पावणेदोन वाजता हर्षनगर येथे अपघात झाला. या अपघाताची नोंद सिटी चौक ठाण्यात करण्यात आली आहे.