Thu, Apr 25, 2019 15:27



होमपेज › Aurangabad › 1274 कोटींचा ‘खडखडाट’

1274 कोटींचा ‘खडखडाट’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





औरंगाबाद : प्रतिनिधी

महानगर पालिकेच्या तिजोरीत सध्या वीजबिल भरण्यासाठी पैसे राहिलेले नाहीत. त्यामुळे पालिका डबघाईला आल्याची टीका होत आहे. या पार्श्‍वभूमिवर सोमवारी पालिका आयुक्‍तांनी सन 2018-19 चे तब्बल 1274 कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सादर केले. जमा खर्चाचे हे अंदाजपत्रक 16 लाख रुपये शिलकीचे आहे. एवढ्या अवाढव्य खर्चाचे अंदाजपत्रक पाहून स्थायी समिती सदस्यांच्याही भुवया उंचावल्या. 

अंदाजपत्रकात 265 कोटींचा प्रशासकीय खर्च, 207 कोटींचे नवे रस्ते, 42 कोटींचे पॅचवर्क, 38 कोटींचे एलईडी पथदिवे, पाणीपुरवठ्याचे वीजबिल अशा प्रमुख मोठ्या खचार्र्ंचा समावेश आहे. प्रभारी महापालिका आयुक्‍त नवलकिशोर राम यांनी सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत सभापती गजानन बारवाल यांना हे अंदाजपत्रक सादर केले. त्यात नगररचना विभागाच्या उत्पन्नात वाढ करणे, सहा आदर्श रस्ते, सातारा देवळाई भागात 75 कोटींचे रस्ते बनविणे, दहा उद्यानांचा विकास करणे, मालमत्ता कराची वसुली सक्षमपणे करणे, शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन, जीआयएस तंत्रज्ञानाद्वारे सर्वेक्षण करणे, पालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये डायलिसिस सेंटर उभारणे, मॉडल स्कूल तयार करणे, आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या पाल्यांसाठी वसतिगृह चालविणे, अशी अनेक कामे करण्याचा मनोदय प्रभारी मनपा आयुक्‍तांनी व्यक्‍त केला. अंदाजपत्रकावर बोलताना अनेक सदस्यांनी अंदाजपत्रकाचा अभ्यास करण्यासाठी वेळ द्यावा, अशी विनंती सभापती बारवाल यांच्याकडे केली. त्यांची ही विनंती मान्य करीत सभापती बारवाल यांनी आजची बैठक तहकूब केली. पुढील बैठकीत सविस्तर चर्चा करून आवश्यक त्या दुरुस्तीसह या अंदाजपत्रकास मंजुरी दिली जाईल, असे बारवाल यांनी सांगितले. 

Tags : Aurangabad, Aurangabad News, electricity, bills, Municipal Corporation.






  •