Wed, Jul 17, 2019 20:11होमपेज › Aurangabad › राज्यात भाजपसोबत युती नाहीच : उद्धव

राज्यात भाजपसोबत युती नाहीच : उद्धव

Published On: Apr 20 2018 1:17AM | Last Updated: Apr 19 2018 11:49PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

राज्यात शिवसेना यापुढे सर्व निवडणुका स्वबळावरच लढवेल, भाजपसोबत कोणत्याही निवडणुकीत युती करणार नाही, असा पुनरुच्चार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी औरंगाबादेत केला.

त्यांनी सुभेदारी विश्रामगृहावर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या जिल्हावार बैठका घेतल्या. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाची काय तयारी आहे, इच्छुक उमेदवार आहेत का, पक्ष संघटनात्मक पातळीवर कोणते बदल केले पाहिजेत, आदींचा त्यांनी आढावा घेतला. 

उद्धव ठाकरे म्हणाले, येत्या डिसेंबर महिन्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेतल्या जाण्याच्या बातम्या येत आहेत. यावेळी शिवसेना स्वबळावर लढणार आहे.

पावसाळी अधिवेशन मुंबईतच घ्या

यंदाचे पावसाळी अधिवेशन मुंबईऐवजी नागपूरला घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. परंतु, सरकारने हे अधिवेशन मुंबईतच घ्यावे. नागपुरात नुसते अधिवेशन घेण्याऐवजी तेथील जनतेला फायदा होईल, अशा योजना तिथे राबविल्या गेल्या पाहिजेत, अशी सूचनाही उद्धव ठाकरे यांनी केली.