होमपेज › Aurangabad › पोलिस घेणार दारू विक्रेत्याची शाळा

पोलिस घेणार दारू विक्रेत्याची शाळा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

दारू विक्रेत्यांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडत असल्याचे पोलिस आयुक्‍तांच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच पोलिसांनी काही दारूची दुकाने महिनाभरासाठी बंद करण्याचाही निर्णय घेतला, परंतु या कारवाईमुळे परिस्थितीत फारशी सुधारणा दिसून न आल्यामुळे यापुढे पोलिस शहरातील सर्व दारू विक्रेत्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यासाठी पंधरा दिवसांमध्ये दारू विक्रेत्यांची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्‍त यशस्वी यादव यांनी बुधवारी (दि. 29) पत्रकारांना दिली. 

पोलिसांना दारू दुकान बंद करण्याचे अधिकार नाहीत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडविणार्‍या दुकानदाराविरुद्ध पोलिस निरीक्षक आपल्या अधिकारात नोटीस देऊन केवळ एक महिना दुकान बंद ठेवू शकतात. परंतु, यामुळे पुन्हा परिस्थिती सुधारेल याची काहीही शाश्‍वती नसते. तसेच, काही निर्ढावलेले दारू विक्रेते चक्‍क पोलिसांनाच न्यायालयात आव्हान देतात. यामुळे अनेकदा पोलिसांना माघार घ्यावी लागते. परंतु, यापुढे दारू विक्रेत्यांनीच नियमांचे पालन करावे, यासाठी पोलिस बैठक घेऊन मार्गदर्शन करणार आहेत. दारू विक्रीबाबत मार्गदर्शिका ठरवून देणार असल्याचे पोलिस आयुक्‍तांनी मान्य केले.