Sat, Apr 20, 2019 23:54होमपेज › Aurangabad › औरंगाबादमधील गैरकृत्याचा निषेध

औरंगाबादमधील गैरकृत्याचा निषेध

Published On: Aug 11 2018 1:39AM | Last Updated: Aug 11 2018 1:23AMऔरंगाबाद ः प्रतिनिधी

मराठा क्रांती मोर्चातर्फे क्रांतिदिनी आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेत महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने समन्वयक विनोद पाटील यांनी आभार मानले. या वेळी औरंगाबादमधील गैरकृत्याचा मराठा क्रांती मोर्चातर्फे जाहीर निषेध केला. शहरात शांततेत आंदोलन सुरू असताना वाळूजमध्ये अपप्रवृत्तींनी कंपन्यांत घुसून तोडफोड केली. मात्र, यात मराठा समाजाचे आंदोलक नव्हते, ते चौकाचौकांत ठिय्या देत होते. छत्रपती शिवरायांचा मावळा असे कृत्य करणारच नाही, असा दावा त्यांनी केला. तसेच उद्योजकांनी सीसीटीव्ही फुटेज पोलिस आणि सीआयडीला उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले.

औरंगाबादप्रमाणेच पुणे शहर शांत व चाकणमध्ये जाळपोळ झाली. नवी मुंबईतही असेच चित्र होते. त्यामुळे या तिन्ही घटनांमध्ये संबंध तर नाही ना, हेही सीआयडी चौकशीतून समोर येईल. आतापर्यंत ‘आयडेंटीफाय’ झालेल्यांमध्ये एकही मराठा समाजाचा आंदोलक आढळलेला नसून, इतरच गुन्हे असलेले लोक सापडले, हे विशेष. औरंगाबादेत तर त्यापेक्षाही भयंकर चित्र समारे येईल, असे पाटील म्हणाले.

शहराच्या अस्मितेची तोडफोड

वाळूज येथील उद्योगांचीच नव्हे तर ही औरंगाबादच्या अस्मितेची तोडफोड असून शहरासाठी अजिबात भूषणावह नाही. गैरसमजातून आमच्यावर आरोप होत असून, उद्योजकांच्या दुःखात सहभागी आहोत, त्यांना भेटणार आहोत. उद्योजकांच्या खांद्याला खांदा लावून चौकशीस मदत करण्यास तयार आहोत. आम्हालाही घटनेचे गांभीर्य असून उद्योगांतील कामगार, कर्मचारी 90 टक्के मराठा समाज आहे. शहरात मोठमोठे प्रकल्प यावे, जेणेकरून युवकांच्या हाताला काम मिळेल, असे पाटील म्हणाले.