Tue, Mar 26, 2019 12:20होमपेज › Aurangabad › जिल्हा कोर्टात लिफ्ट कोसळली; सातजण बालंबाल बचावले

जिल्हा कोर्टात लिफ्ट कोसळली; सातजण बालंबाल बचावले

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

जिल्हा कोर्टातील लिफ्ट तांत्रिक बिघाड होऊन चौथ्या मजल्यावरून तळमजल्यावर कोसळली आणि लिफ्टचा दरवाजा आपोआप लॉक झाला. हा प्रकार लक्षात येताच पोलिस व इतरांनी मोठ्या प्रयत्नांनी कसाबसा दरवाजा उघडला आणि लिफ्टमधील जखमी व गुदमरलेल्या सात जणांनी एकदाचा मोकळा श्‍वास घेतला. या प्रकारामध्ये लिफ्टचे सीलिंगही तुटले आणि बहुतेकांना चांगलाच मुका मार लागला. जिल्हा कोर्टाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सोमवारी (दि.26) दुपारी हा प्रकार घडला.

जिल्हा कोर्टातील पक्षकार, नागरिक, वकील असे सातजण चौथ्या मजल्यावरून लिफ्टमध्ये बसले आणि बहुतेकांना तळमजल्यावर यायचे होते. मात्र क्षणार्धात लिफ्टचा नेहमीचा वेग अचानक किती तरी पटींनी वाढला आणि जणू घसरगुंडीप्रमाणे काही कळायच्या आत लिफ्ट तळमजल्यावर आदळली. त्याचक्षणी भला मोठा आवाज झाला आणि लोक सैरावैरा पळू लागले. तो आवाज लिफ्टचाच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नागरिकांनी तिकडे धाव घेतली. मात्र त्याच क्षणी लिफ्टचा दरवाजा आपोआप लॉक झाला. त्यामुळे अडकलेल्या लोकांचा ओरडण्याचा आवाज, लिफ्टच्या आतल्या बाजूने दरवाजावरील हाताच्या जोरजोरात थापा बाहेर ऐकू येऊ लागल्या. मात्र दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करूनही काही केल्या उघडेना म्हणून अस्वस्थता आणखीच वाढत गेली. त्याच परिसरात न्यायालयीन कामासाठी आलेल्या पोलिसांनीही दरवाजा उघडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. तब्बल 10-15 मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर दरवाजा कसाबसा उघडण्यात यश येऊन अडकलेल्या सातजणांची सुटका करण्यात आली. 

Tags : 


  •