Fri, Apr 26, 2019 17:28होमपेज › Aurangabad › चाचणीसाठी टीईटी पात्र की अपात्र संभ्रम कायम

चाचणीसाठी टीईटी पात्र की अपात्र संभ्रम कायम

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

शिक्षण सेवक पदासाठी घेण्यात येणार्‍या अभियोग्यता व बुद्धीमापन चाचणीसाठी जे टीईटी परीक्षा उत्तीर्ण आहेत तेच उमेदवार पात्र आहेत. मात्र राज्यात टीईटी उत्तीर्ण उमेदवार हे 58 हजार असून सुमारे 2 लाख अर्ज अभियोग्यता चाचणीसाठी आले आहेत. 

राज्य परीक्षा परिषदेतर्फे डिसेंबरमध्ये शिक्षण सेवक पदाच्या भरतीसाठी प्रथमच अभियोग्यता चाचणी व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेसाठी अर्ज घेण्यात येत आहेत. मात्र या परीक्षेसाठी उमेदवार टीईटी उत्तीर्ण असावा, अशी अट ठेवण्यात आली होती.

मात्र ऐन अर्ज प्रक्रियेत त्यासंबंधीचा पर्यायच न दिल्यामुळे सर्वांनीच या परीक्षेसाठीचे अर्ज भरले आहे. टीईटी पात्र उमेदवार हे 58 हजार असून त्यासाठी 1 लाख 98 हजार 169 उमेदवारांनी अर्ज केले आहे. त्यामुळे टीईटी पात्र असणे आवश्यक आहे की नाही, या अटीसंदर्भात उमेदवारांतही संभ्रम निर्माण झाला आहे.