Sat, Jul 20, 2019 10:44होमपेज › Aurangabad › कोर्टाने हर्सूलला रवानगी करताच दोन्ही नगरसेवकांची प्रकृती बिघडली

कोर्टाने हर्सूलला रवानगी करताच दोन्ही नगरसेवकांची प्रकृती बिघडली

Published On: Jan 07 2018 2:01AM | Last Updated: Jan 07 2018 12:46AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घालून सार्वजनिक मालमत्तेचे नूकसान केल्याप्रकरणी सिटीचौक पोलिसांनी एमआयएमच्या दोन फरार नगरसेवकांना शुक्रवारी अटक केली. दोघांना कोटार्र्र्ने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर जामिनसाठी अर्जावर विचार न करण्यात येताच दोघांनी प्रकृती खराब झाल्याचे म्हटल्याने त्यांना पोलिसांनी घाटीत दाखल केले. त्यापैकी सैय्यद मतीन यांची प्रकृती शनिवारी सुधारल्याने त्यांची रवानगी पोलिसांनी हसूर्र्र्ल कारागृहात केली आहे. 

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत दोन महिन्यांपूर्वी गोंधळ घालून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करत महापौरांचा राजदंड पळवून नेण्याचा प्रयत्न करीत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबाबत दाखल गुन्ह्यात पोलिसांनी शुक्रवारी एमआयएमचे नगरसेवक शेख जफर शेख अख्तर आणि सैय्यद मतीन सैय्यद रशीद यांना अटक करुन न्यायालयात हजर केले. पोलिसांच्या रिमांड यादीनुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर.आर. मावतवाल यांनी त्या दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली.

त्यामुळे आता आपल्याला जामिन मिळणार हे गृहीत धरून दोन्ही नगरसेवकांनी अर्ज केला. मात्र न्यायालयाने दोघांची रवानगी हसूर्र्र्ल कारागृहात करण्याचा आदेश दिला. त्यामूळे मतीन व जफर यांची प्रकृती खराब झाली. मतीन यांनी छातीत त्रास होत असल्याचे व जफर यांनी लघवीतून रक्त येत असल्याचे सांगितले. दोघांना पोलिसांनी घाटीत आणले असता डॉक्टरांनी अतिदक्षता विभागात दाखल करून घेतले. यापैकी शनिवारी सायंकाळी मतीन यांची प्रकृती सुधारल्याने डॉक्टरांनी सांगितल्यावर पोलिसांनी त्यांची रवानगी हर्सूल कारागृहात केली आहे. तर जफर यांच्यावर उपचार सूरू आहेत.

जामीन मिळू शकतो

न्यायालयाने दोघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. मात्र शुक्रवारी दोघांना जामिन न मिळाल्याने त्यांना हर्सूल मध्ये नेण्यात येत होते. अचानक दोघांची प्रकृती बिघडल्याने त्यांना घाटीत दाखल केले होते. मतीन यांची रवानगी शनिवारी कारागृहात केली आहे. दोघांना कधीही जामिन मिळू शकतो, नसता नियमाप्रमाणे त्यांना 14 दिवस कारागृहात रहावे लागणार असल्याचे पोलिस उपनिरिक्षक आर.एम.बांगर यांनी सांगितले.