Thu, Jul 18, 2019 04:09होमपेज › Aurangabad › जाती निर्मूलन हा राज्यकर्त्यांचा हेतूच नाही : जयदेव डोळे 

जाती निर्मूलन हा राज्यकर्त्यांचा हेतूच नाही : जयदेव डोळे 

Published On: Aug 27 2018 1:12AM | Last Updated: Aug 27 2018 1:06AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

जातीअधारित जनगणनेमागे भारतातील जाती निर्मूलन हा हेतूच नव्हता. मनमोहनसिंगाच्या काळातही अशीच भूमिका होती. तीच भूमिका भाजप सरकारनेही पुढे चालविली आहे. कारण भाजप सरकारला व आरएसएसला जातीच्या आधारावर हिंदूराष्ट्र उभारायचे आहे. समता हा त्यांचा हेतू नसल्याचा दावा ज्येष्ठ पत्रकार प्रा. जयदेव डोळे यांनी रविवारी (दि.26) केला. 

सुगावा प्रकाशनातर्फे मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनीच्या सभागृहात अ‍ॅड. विष्णू ढोबळे यांच्या ‘जाती निर्मूलन : राष्ट्रीय गरज’ या पुस्तकाचे रविवारी (दि. 26) प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. जयदेव डोळे बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे होते. सुभाष लोमटे, प्रकाशक विलास वाघ, लेखक अ‍ॅड. विष्णू ढोबळे, रंजन दाणी आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. पुढे बोलताना प्रा. जयदेव डोळे यांनी समरसता हा फसवा शब्द आजचे राज्यकर्ते वापरत असल्याचे सांगितले. जातीव्यवस्था मोडण्यासाठी सर्वांनी मनापासून प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

जातींचा सत्तेसाठी वापर जेवढा इंग्रजांनी केला, त्यापेक्षा कैक जास्त पटींनी येथील राज्यकर्त्यांनी केला. जातीच्याच आधारे देशाचे समाजकारण, अर्थकारण आणि राजकारण केले. हे आता थांबले पाहिजे, अशी भूमिका लेखक अ‍ॅड. विष्णू ढोबळे यांनी मांडली. सुभाष लोमटे यांनीही कार्यक्रमात आपली भूमिका मांडली. रंजन दाणी यांनी सूत्रसंचालन केले.