Sun, Nov 18, 2018 05:22होमपेज › Aurangabad › ‘समांतर’साठी मियाँ-बीवी राजी

‘समांतर’साठी मियाँ-बीवी राजी

Published On: Apr 11 2018 1:34AM | Last Updated: Apr 11 2018 12:46AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

समांतर जलवाहिनी प्रकल्पाचे काम मार्गी लावण्यासाठी शासनाच्या मध्यस्थीने सिटी वॉटर युटिलिटी कंपनीसोबत तडजोड करण्यासाठी महानगरपालिकाही अखेर  राजी झाली. या तडजोडीसाठी शासनस्तरावर लवकरच संयुक्‍त बैठक होणार आहे. त्या बैठकीत ठेवण्याकरिता पालिकेने आपला प्रस्ताव तयार केला आहे. प्रकल्पासाठी मनपा कोणतीही वाढीव रक्‍कम देणार नाही. प्रकल्प पूर्ण होईपर्यंत पाणीपट्टीत वाढ केली जाणार नाही. तसेच प्रकल्पाचा खर्च वाढवून दिला जाणार नाही, अशी भूमिका मनपाने घेतली. कंपनीने आधीच तडतोडीसाठी तयारी दाखविलेली आहे. त्यामुळे आता केवळ शासनाकडून शिक्कामोर्तब होण्याची औपचारिकता बाकी आहे.महापौर नंदकुमार घोडेले यांच्या उपस्थितीत मंगळवारी समांतरच्या विषयावर पदाधिकारी आणि अधिकार्‍यांची बैठक झाली. 

Tags : Aurangabad, corporation, pay, any, increment, amount, project