Sun, Aug 25, 2019 04:43होमपेज › Aurangabad › महिलेच्या पोटातून काढला दोन किलोचा गोळा  

महिलेच्या पोटातून काढला दोन किलोचा गोळा  

Published On: Dec 23 2017 2:02AM | Last Updated: Dec 23 2017 1:52AM

बुकमार्क करा

कन्नड : प्रतिनिधी

पोटातून दोन किलो वजनाचा गोळा काढून जाधव हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी एका महिलेवरील शस्रक्रिया यशस्वी केली. सध्या ही महिला सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.  20 डिसेंबर रोजी तालुक्यातील वडनेर येथील एका  चाळीस वर्षीय महिलेला श्वास घेतना त्रास होत होत होता.

त्यामुळे तिला नातेवाईकांनी शहरातील जाधव हॉस्पिटलमध्ये दाखल केले. प्रथम महिलेची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्या पोटात मासांचा गोळा असल्याचे निदर्शनास आले.  यावेळी स्रीरोग तज्ञ एस. जे. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नातेवाईकांच्या परवानगीने महिलेची शस्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी डॉ. नितीन जगताप यांनी या महिलेच्या पोटातून दोन किलो वजनाचा गोळा काढून यशस्वी शस्त्रक्रिया केली. ही प्रक्रिया जवळपास साडेतीन तास चालली. शहरात प्रथमच ही शस्रक्रिया करण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉ. मनोज राठोड, कृष्णा सपकाळ, नयना जगताप, डॉ. सोहेल खान, डॉ. सदाशिव पाटील यांनी परिश्रम घेतले.