Fri, May 24, 2019 20:53होमपेज › Aurangabad › पत्नीने पोलिसांना मेल करून दिली शवविच्छेदनाची परवानगी

विदेशी नागरिकाचा मृतदेह अमेरिकेला पाठविला 

Published On: Dec 21 2017 1:54AM | Last Updated: Dec 21 2017 1:33AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

जेवण करून फळं खात असताना अचानक बेशुद्ध होऊन मृत्यू झालेल्या त्या विदेशी नागरिकाचा मृतदेह रात्री 8 वाजताच्या विमानाने अमेरिकेला पाठविण्यात आला आहे. दरम्यान, त्याच्या पत्नीने मेल करून शवविच्छेेदन करण्याची परवानगी दिल्याने पोलिसांनी इनकॅमेरा शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण केली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये  फेलिसियानो हारनावडेज क्‍लोडिओ (वय 63, रा. पोर्टारिको, अमेरिका) हे सोमवारी रात्री आपल्या सहकार्‍यांसह जेवण केल्यावर फळं खात होते. या वेळी अचानक अंगाला मुंग्या आल्या सारखे होऊन ते बेशुद्ध पडले होते. त्यामुळे त्यांच्या सहकार्‍यांनी त्यांना तत्काळ हॉटेलमधील कर्मचार्‍यांच्या मदतीने त्यांना जवळच्या रुग्णालयात हलविले होते. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. ही बाब पोलिसांना माहिती होताच पासपोर्ट विभागाने ही घटना तत्काळ अमेेरिकन दूतावासाला कळविली. तसेच त्यांची हॉटेल मधील रूमदेखील पोलिसांनी सील केली. त्यानंतर क्‍लोडिओ यांचा मृतदेह हा घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविला होता. क्‍लोडिओ हे चिकलठाणा एमआयडीसीतील वोक्हार्ट कंपनीत ऑडिट करण्यासाठी सहकार्‍यांसोबत आले होते.

या वेळी पोलिसांनी त्यांच्या सहकार्‍यांचे जबाब नोंदवून त्यांच्या परवानगीने शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू करणार होते. मात्र क्‍लोडिओ यांच्या पत्नीने आपण येईर्र्पर्यंत शवविच्छेदन करू नये. मी जपान येथून येत असल्याचा निरोप पाठविला होता. त्यामुळे शवविच्छेदन मंगळवारी होऊ शकले नव्हते. यानंतर त्यांच्या पत्नीने बुधवारी मृत क्‍लोडिओ यांचे सहकारी व पोलिसांना मेल करून शवविच्छेदन करण्याची परवानगी दिली. तसेच त्या अमेरिकेला जात असल्याचे वोक्हार्ट कंपनीचे प्रशासन व्यवस्थापक शैलेंद्र वैद्य यांनी सांगितले.