Mon, Nov 19, 2018 06:17होमपेज › Aurangabad › तर आंबेडकरी चळवळ माओवादी बनेल : मुणगेकर

तर आंबेडकरी चळवळ माओवादी बनेल : मुणगेकर

Published On: Jun 29 2018 1:03AM | Last Updated: Jun 29 2018 1:07AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

सध्याच्या सरकारला देशात पुन्हा पेशवाई आणायची आहे. हे सरकार आल्यापासून दलितांवरील अत्याचार वाढले आहेत. भीमा कोरेगावचा हल्ला एकतर्फी होता. दलितांवर असेच अत्याचार सुरू राहिले तर लोक विद्रोह करतील. कदाचित संपूर्ण आंबेडकरी चळवळ माओवादी बनेल, अशी शक्यता वाटते, असे मत केंद्रीय नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्‍त केले. 

डॉ. गंगाधर पानतावणे अभिवादन आणि अस्मितादर्श अर्धशतकपूर्ती समारंभात ते बोलत होते. बाबासाहेबांच्या स्वप्नातील नवसमाज निर्माण करायचा असेल तर राज्यघटनेचे प्राणपणाने रक्षण करावे लागेल. डॉ. पानतावणे यांच्या वैचारिक परंपरेचे पाईक म्हणून आपले हे परमकर्तव्य आहे, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री भिडेला क्‍लिनचीट कशी देतात, असा सवालही त्यांनी केला.  

भाषण अर्धवट  

मुणगेकरांचे भाषण ऐन रंगात आले होते. मात्र, आठवलेंना पत्रकार परिषदेला जाण्याची घाई असल्यामुळे त्यांनी सूत्रसंचालकामार्फत आटोपते घेण्याची सूचना केली. मुणगेकर यांनी लगेच भाषण आवरले. मात्र, नंतर त्यांनी नाराजी व्यक्‍त करत खडे बोल सुनावले. 

प्रकाशन, वेबसाईटचे लोकार्पण

यावेळी अभिवादन विशेषांक, दलित ग्रामीण साहित्य शब्दकोश, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्रीविषयक विचार आणि प्रवर्तन आदी पुस्तकांचे प्रकाशन झाले. त्याचप्रमाणे डॉ. गंगाधर पानतावणे डॉट कॉम या संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले.