Sat, Feb 23, 2019 06:53होमपेज › Aurangabad › औरंगाबादेत पैठण गेटवर तणाव

औरंगाबादेत पैठण गेटवर तणाव

Published On: May 25 2018 12:07AM | Last Updated: May 25 2018 12:07AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

पैठण गेटजवळील महापुरुषाच्या पुतळ्याच्या दिशेने अंगातील टी शर्ट भिरकावून एकाने पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी रात्री १० वाजता घडली. त्यामुळे या भागात तणाव निर्माण झाला. दरम्यान, क्रांती चौक पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळविले म्हणून पुढील अनर्थ टळला, असे क्रांती चौक पोलिसांनी सांगितले. 

आता परिस्थिती निवळली आहे. काही लोक क्रांती चौक ठाण्यात जमलेले आहेत. प्रकरण मिटण्याची शक्यता असली तरी पोलिस रिस्क घेण्याच्या तयारीत नाहीत. संबंधितावर गुन्हा नोंद केला जाईल, असे ठाण्यातील सूत्रांनी सांगितले.