Sun, Jul 21, 2019 07:46होमपेज › Aurangabad › दहा महिन्यांच्या मुलाचा पित्याने केला खून

दहा महिन्यांच्या मुलाचा पित्याने केला खून

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सिल्‍लोड : प्रतिनिधी 

सिल्‍लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे बापाने भावाच्या मदतीने आपल्या पोटच्या दहा महिन्यांच्या चिमुकल्याला दगडाने ठेचून ठार मारले व पुरून टाकले. पत्नी मुलाला घेऊन फरार झाल्याची खोटी तक्रार चुलत सासर्‍याला पोलिस ठाण्यात देण्यास भाग पाडले. मात्र पोलिस तपासात खरी सत्यता समोर आली. क्रूरतेचा कळस गाठणार्‍या या घटनेमुळे तालुक्यात खळबळ माजली असून या प्रकरणी मुलाचा खून करणार्‍या बाप व काकाविरुद्ध सिल्‍लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर संदीप मोरे (वय 10 महिने) असे असून खून झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. संदीप काशिनाथ मोरे (वय 28, सागरचा पिता) व किशोर काशीनाथ मोरे वय (34 वर्ष, सागराचा काका)अशी आरोपींची नावे आहेत. दोघा नाराधमांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना 9 दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सिल्‍लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथील कविता धूपचंद आमटे हिचा विवाह तीन वर्षांपूर्वी घाटनांद्रा येथील संदीप मोरे यांच्याशी झाला.  दोघांचा संसार सुरळीत सुरू असताना एका महिन्यापूर्वी दोघांमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद झाल्याने कविताच्या सासर्‍याने तिला तिच्या माहेरी आणून सोडले, मात्र त्यानंतर आठ दिवसांतच घरच्यांची  कविताच्या समजूत काढून तिला पुन्हा सासरी पोहोचविले, परंतु रविवार रोजी (दि. 31) कविता व तिचा दहा महिन्यांचा मुलगा घाटनांद्रा येथून बेपत्ता झाल्याची तक्रार चुलत सासरे बाबूराव पाटीलबा मोरे (रा. घाटनांद्रा) यांनी सिल्‍लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी कविता व सागरचा शोध घेतला. नातेवाइकांनी जखमी कविताला सिल्‍लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मुलाचा त्याच्या वडील आणि काकांनी खून केल्याची माहिती कविताने मामा, अशोक आमटे यांना दिली. त्यांनी सिल्‍लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात संदीप व किशोर याने भाच्याचा खून केल्याची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी वडील संदीप मोरे व काका किशोर मोरे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली 

रात्रभर पत्नी व मुलाला बेदम मारहाण 

पत्नी व मुलाला या आरोपींनी एक दिवस शेतात कोंडून ठेवले होते. चुलत सासरे यांना चुकीची माहिती देऊन त्यांना पोलिसात सून आणि नातू बेपत्ता असल्याची खोटी तक्रार देण्यास भाग पाडले. रात्रभर पत्नीला व मुलाला बेदम मारहाण त्यांनी केली होती. यात मुलाचा मृत्यू झाला. कविताने या नराधमांच्या तावडीतून कशीतरी आपली सुटका करून घेतली यामुळे तिचे प्राण वाचले. वडील व काकाने चिमुरड्या बालकास गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या ओढ्यातील वाळूच्या ढिगार्‍यात पुरले. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी मुलाचा मृतदेह बाहेर काढला व सिल्‍लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. हा खुनाचा प्रकार असल्याने डॉक्टरांनी शवविछेदनसाठी मृतदेह औरंगाबाद येथील जिल्हा रुग्णालयात पाठविला. 


  •