Wed, Jan 16, 2019 17:32होमपेज › Aurangabad › तरुणीचा संशयास्पद मृत्यू 

तरुणीचा संशयास्पद मृत्यू 

Published On: Mar 10 2018 2:09AM | Last Updated: Mar 10 2018 1:01AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

राजनगरात गुरुवारी (दि. 8) घरामध्ये 17 वर्षीय तरुणीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या प्रकरणात छेड काढून तिला आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून संशयितांविरुद्ध मुकुंदवाडी ठाण्यात शुक्रवारी (दि. 9) गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणात तिघांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, कुटुंबीय सैलानी बाबा यात्रेला गेल्यानंतर एकटी मुलगी घरी कशी ठेवली? यासह विविध प्रश्‍न उपस्थित झाल्यामुळे सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे यांनी दिली.

सोनू भगवान शिंदे (17, रा. राजनगर, जगताप शाळेजवळ, मुकुंदवाडी) असे मृत तरुणीचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनूची आई आणि भाऊ हे 5 मार्च रोजी सैलानी बाबा यात्रेसाठी गेले. ते दोघे वेगवेगळ्या वाहनांमध्ये होते. आईला वाटले सोनू भावासोबत आहे आणि भावाला वाटले सोनू आईसोबत आहे. त्यामुळे थेट यात्रेत गेल्यानंतरच त्यांना सोून आपल्यासोबत नसल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, यात्रा संपल्यावर 8 मार्चला सकाळी कुटुंबीय घरी आले. त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. उग्र वास     /पान 2 वर