Wed, Apr 24, 2019 01:32होमपेज › Aurangabad › विरोधी पक्षनेत्यांसह तिघांचे निलंबन

विरोधी पक्षनेत्यांसह तिघांचे निलंबन

Published On: Feb 16 2018 1:53AM | Last Updated: Feb 16 2018 1:31AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

मनपातील विरोधी पक्षनेता फेरोज खान यांनी गुरुवारी सर्वसाधारण सभेत नगररचना विभागातील उपअभियंता अविनाश देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत कारवाईची मागणी केली. खान यांच्यासह एमआयएमच्या इतर दोन नगरसेवकांनीही या मागणीसाठी महापौरांसमोर येऊन जमिनीवर बैठक मारली. त्यानंतर गोंधळ वाढल्याने महापौरांनी फेरोज खान, गंगाधर ढगे, जमिर कादरी यांचे सदस्यत्व दिवसभरासाठी निलंबित केले.

सर्वसाधारण सभेत दुपारच्या सत्रात विरोधी पक्षनेता फेरोज खान हे हातात कागदपत्रं घेऊन बोलण्यासाठी जागेवर उभे राहिले. त्यांनी हातातील कागदपत्रं दाखवित सातारा-देवळाई भागात बांधकाम परवानगीच्या कामात उपअभियंता अविनाश देखमुख यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप केला. मी शासनाकडे या प्रकरणी तक्रार केली होती. शासनाने दोन महिन्यांपूर्वीच त्यांच्या चौकशीचे आदेश मनपा आयुक्तांना दिले, परंतु आतापर्यंत कारवाई झाली नाही, असा आरोप त्यांनी केला. याच दरम्यान सेनेचे नगरसेवक राजू वैद्य यांनी खान यांच्या शब्दांवर आक्षेप नोंदविला. अशा प्रकारे सभागृहात अधिकार्‍यांविरुद्ध आरोप करणे चुकीचे आहे, सभागृहाचा सन्मान राखला पाहिजे, असे वैद्य म्हणाले. त्यानंतर महापौरांनीही खान यांना पुढील विषय घ्यायचा असल्याचे सांगत खाली बसण्याची सूचना केली. मात्र त्यानंतर फेरोज खान, त्यांच्या पक्षाचे नगरसेवक जमिर कादरी, गंगाधर ढगे हे महापौरांसमोर आले. त्यांनी या विषयावर चर्चा करून कारवाई करा, अन्यथा आम्ही खाली बसतो असे म्हणत जमिनीवर बैठक मारली. महापौरांनी वारंवार सांगूनही या तिघांनी त्यांचे ऐकण्यास नकार दिला. त्यावर महापौर नंदकुमार घोडेले यांनी ढगे, कादरी व खान यांचे सदस्यत्व दिवसभरासाठी निलंबित करीत असल्याची घोषणा केली. महापौरांच्या या घोषणेनंतर एमआयएमचे सर्वच नगरसेवक सभागृहाबाहेर पडले. सर्व सदस्यांनी मनपा प्रवेशद्वारातील पायर्‍यांवर बसून नगरसेवकांचा आवाज दाबणार्‍या महापौरांचे करायचे काय, भ्रष्ट अधिकार्‍यांना पाठीशी घालणार्‍या महापौरांचा निषेध असो अशा जोरदार घोषणा