होमपेज › Aurangabad › घरात गळफास घेऊन आत्महत्या

घरात गळफास घेऊन आत्महत्या

Published On: Dec 21 2017 1:54AM | Last Updated: Dec 21 2017 1:25AM

बुकमार्क करा

वैजापूर : प्रतिनिधी 

घरची आर्थिक हलाखीची परिस्थिती, बोंडअळीने हातातून गेलेला कापसामुळे हताश झालेल्या आई-वडिलांचे दु;ख पाहणे अशक्य झालेल्या एका 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी 3 वाजेला तालुक्यातील पोखरी शिवारात घडली. 

भारती तुकाराम मालकर रा. पोखरी असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, भारती ही आपल्या कुटुंबीयांसह पोखरी शिवारातील शेतवस्तीवर राहते. ती महाविद्यालयात शिक्षण घेत होती. बुधवारी दुपारी ती छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. कुटुंबीयांनी ग्रामस्थांच्या मदतीने खाली उतरवून भारतीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान भारती ही महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ती आईसोबत शेतात मजुरीला जात होती.

मागील काही दिवसांपासून तिच्या विवाहाची चर्चा कुटुंबीयात सुरू होती, मात्र यावर्षी बोंडअळीमुळे कपाशीचे उत्पादनातील फटका व घरची हलाखीची परिस्थितीमुळे विवाहाचा भार कसा पेलायचा या चिंतेत वडील असल्याचे तिच्या लक्षात आले होते. यामुळे भारतीला नैराश्याने ग्रासले होते. त्यातच तिने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी शिऊर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.