Mon, Jun 17, 2019 01:09होमपेज › Aurangabad › आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या मुलीला दहा हजारांची मदत

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या मुलीला दहा हजारांची मदत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

गंगापूर : प्रतिनिधी 

तालुक्यातील पांढरओहळ येथील दिव्यांग शेतकरी सीताराम राधाकिशन वल्‍ले यांनी कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्यामुळे 18 रोजी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. शेतकरी संघर्ष कृती समिती तसेच संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकार्‍यांनी या कुटुंबाची भेट घेतली. तसेच वल्ले यांच्या मुलीचे सुकन्या योजनेअंतर्गत बँक खाते उघडून त्यात दहा हजार रुपयांची रक्कम जमा केली. मुलीचे सैनिक शाळेत संपूर्ण शिक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारली.

वल्ले कुटुंबीयांना शासकीय मदत लवकरात लवकर मिळावी, यासाठी कागदपत्रांची पूर्तता करून दिली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश शेळके, शेतकरी कामगार पक्ष विधानसभा अध्यक्ष महेश गुजर, शिवबा संघटनेचे देवीदास पाठे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संपत रोडगे, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष अविनाश शिंदे, संकेत मैराळ, अंकुश दुबिले, कृष्णा कोळगे, विष्णू वल्‍ले आदी उपस्थित होते