Wed, Sep 19, 2018 15:03होमपेज › Aurangabad › झोक्याचा फास बसून मुलाचा मृत्यू

झोक्याचा फास बसून मुलाचा मृत्यू

Published On: Jan 16 2018 2:16AM | Last Updated: Jan 16 2018 2:08AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

घरातच दुसर्‍या मजल्यावर झोका खेळताना फास बसून करण ऊर्फ संकेत किशोर गुंजाळ (महाजन) या चौदा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मुकुंदवाडीतील प्रकाशनगरात 15 जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली.  

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, करण हा पिनाकेश्‍वर शाळेत आठवीत शिक्षण घेत होता. तो दुपारी प्रकाशनगरातील घरात दुसर्‍या मजल्यावर झोका खेळत होता. कुटुंबीय खालच्या मजल्यावर होते. झोक्यासह गोल फिरताना त्याच्या गळ्याला दोरीचा फास बसला. काही क्षणात तो अत्यावस्थ झाला. करणला आवाज दिल्यानंतर त्याने काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नातेवाईक वरच्या मजल्यावर त्याला पाहण्यासाठी गेले. हा प्रकार लक्षात येताच प्रशांत घोडके यांनी त्याला लगेचच घाटी रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची नोंद मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात करण्यात आली.