Sat, Apr 20, 2019 16:34होमपेज › Aurangabad › ‘सोमरस, मद्य यातील फरक ओळखा’

‘सोमरस, मद्य यातील फरक ओळखा’

Published On: Jan 22 2018 10:36AM | Last Updated: Jan 22 2018 10:28AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

सोमरस, सोमयाग आणि सोमयोग हे वेगवेगळे आहेत याची तुलना मद्याशी किंवा अल्कोहोलशी करणे चूकच आहे, असे मत हैदराबादमधील सॅक्रिड सोमा वैदिक सायन्स रिसर्च फाउंडेशनचे योगसोमाचार्य सोमा डॉ. सुनील सांबारे यांनी व्यक्‍त केले.

सिडकोतील अग्रसेन भवन येथे आयोजित वैदिक संमेलनाचा समारोप रविवारी झाला. समारोपाच्या आधी झालेल्या सत्रात ‘सोमरस आणि सोमयाग’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. या व्याख्यानंतर समारोपाचा कार्यक्रम झाला. पंडितप्रवर गणेश्‍वर शात्री द्रविड, खा. चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी, मुकुंदकाका जाटदेवळेकर, संमेलन समिती अध्यक्ष अनिल भालेराव, संयोजक दुर्गादास मुळे आदींची उपस्थिती होती.

डॉ. सांबारे म्हणाले, सोमयागमुळे दूषित पर्यावरणाला चांगले करू शकतो. पर्यावरणावरील दुष्परिणाम हा याग केल्याने टळू शकतात. यासारखेच महत्त्व सोमरसाचे आहे. सोमरस म्हणजे दारू-मद्य असा गैरसमज आहे; पण सोमरस आणि मद्य यातील फरक ओळखला पाहिजे. दोन्ही वस्तू वेगवेगळ्या आहे. सोमरस हा वनस्पतीचा हे. या सोमरसामुळे तणाव नाहीसा होतो. मी हैदराबाद येथील सोमयोग, सोमयाग, सोमरस यावर 22 वर्षांपासून संशोधन करता आहेत. आमचे फाउंडेशन यासाठी खूप मेहनत घेत आहे. आज ही सर्व मांडणी करायची मला संमेलनानिमित्त संधी मिळाली हे माझे मी भाग्य समजतो. ते म्हणाले, सोमरस हे मद्यपान नाही. आरोग्यास ते उपयुक्‍त आहे. ते ताणतणाव दूर करते. सोमयागाचेही तसेच आहे. सोमयागामुळे पर्यवरणावर होणारे दुष्परिणाम टाळू शकतो हे आम्ही सिद्ध केले आहे. सोमरसासाठी उपयुक्‍त दिव्यसोम वनस्पतीची शेतीसुद्धा करत आहोत. मराठवाड्यातील नांदेड, सोलापूर यांसारख्या भागासह गुजरात, आंध्र, गुंटूर या प्रांतात सध्या शेती प्रयोग होत आहेत ते यशस्वीही झाले आहे. समारोपाच्या आधी राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी यांनी ‘वाचा बोलो वेदनिती’ या विषयावर व्याख्यान झाले.