Sat, Jul 20, 2019 23:51होमपेज › Aurangabad › मराठा समाजाचे आभार मानतो: रामदास आठवले 

कोरेगाव भीमाच्या घटनेमागे मराठा संघटनांचा हात: रामदास आठवले 

Published On: Jan 14 2018 2:23PM | Last Updated: Jan 14 2018 2:54PM

बुकमार्क करा
औरंगाबाद: प्रतिनिधी

कोरेगाव भीमा येथील घटना खूपच दुर्दैवी आहे. या घटनेमागे मराठा संघटनांचा हात असल्याचा आपल्याला संशय आहे. त्यामुळे सरकारने या संपूर्ण घटनेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी औरंगाबादेत केली. दलित समाजाच्या बंद दरम्यान मराठा समाजाने सामंजस्याची भूमिका घेतली, त्यांच्याकडून बंदला कोणताही विरोध झाला नाही. त्यामुळे मी मराठा समाजाचे आभार मानतो, असेही आठवले म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त आठवले औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. या दौर्या्त त्यानी सुभेदारी विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन कोरेगाव भीमाच्या घटनेसह विविध विषयांवर त्यांची भूमिका मांडली. 

कोरेगाव भीमा येथील प्रकार हा नियोजनबद्ध होता. दोन समाजात वाद पेटविण्याचा हा प्रयत्न होता. 31 डिसेंबरला मी स्वतः वढूला जाऊन आलो होते. तेव्हा तिथे समाधीचा वाद मिटला होता. परंतु नंतर मराठा संघटनांची बैठक झाली, त्यातून मोर्चा निघाला आणि पुढे हा प्रकार घडला, असेही ते म्हणाले. कोरेगाव भीमाच्या घटनेनंतर प्रकाश आंबेडकरांनी बंदचे आवाहन केले. परंतु त्यांनी आवाहन केले म्हणून बंद झाला असे नाही. तो होणारच होता. शिवाय बंदमध्ये माझे कार्यकर्तेच आघाडीवर होते. मी बॅकफूट वर गेलो, असे म्हणणे चुकीचे आहे, बॅकफूटवरुन फ्रंटफूटवर कसे जायचे हे मला चांगले ठाऊक आहे, असा टोलाही आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना मारला. 

वाचा संबंधित बातम्या

सोशल मीडियावर आंबेडकर विरुद्ध आठवले

अनियंत्रित हिंदुत्ववादी संघटनांचा धोकाः आंबेडकर

दलितांचा राजा होतो; पुढेही राहीन : अ‍ॅड. आंबेडकर

प्रकाश आंबेडकर राजे..आठवलेंचे जोरदार प्रत्युत्तर