Wed, Jul 17, 2019 08:00होमपेज › Aurangabad › सहा रस्त्यांची कामे मार्चपर्यंत होणार

सहा रस्त्यांची कामे मार्चपर्यंत होणार

Published On: Dec 02 2017 2:05AM | Last Updated: Dec 02 2017 1:54AM

बुकमार्क करा

औरंगाबाद ः विशेष प्रतिनिधी

जालना रोडसह जिल्ह्यातील सहा प्रमुख रस्त्यांच्या नूतनीकरणाची कामे येत्या 31 मार्च 2018 पर्यंत पूर्ण केली जाणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने (न्हाई) या कामांच्या निविदा काढल्या असून, कामांसाठी तीन महिन्यांची मुदत दिली आहे.

राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी रस्त्यांची कामे, खड्डेमुक्‍त महाराष्ट्र आदींचा आढावा घेतला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या कामांचा बैठकीत विषय निघाला. औरंगाबाद परिसरातील आठ रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. या कामांसाठी आपण केंद्राकडून निधी मंजूर झाला असून, निविदाही काढण्यात आल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. निविदा स्वीकारण्याची मुदत सहा डिसेंबरपर्यंत असून, 31 मार्चपर्यंत कामे पूर्ण करण्याची अट कंत्राटदारांना घालण्यात आल्याचे बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले.

ही कामे होणार 

शहरातील जालना रोड, हर्सूल टी पॉईंट ते महावीर चौक, वाळूज लिंक रोड ,औरंगाबाद - शिर्डी, खुलताबाद - फुलंब्री, औरंगाबाद- मालेगाव आणि औरंगाबाद - जळगाव या रस्त्यांच्या दुरुस्ती  व मजबुतीकरणासाठी 80 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. मार्चपर्यंत कामे पूर्ण होणार असल्याबद्दल पाटील यांनी समाधान व्यक्‍त केले.