Sun, Jan 20, 2019 14:22होमपेज › Aurangabad › जिल्ह्यात चौदाशे क्विंटल तूर खरेदी

जिल्ह्यात चौदाशे क्विंटल तूर खरेदी

Published On: Feb 06 2018 1:43AM | Last Updated: Feb 05 2018 11:21PMबीड : प्रतिनिधी

तूर खरेदीच्या तिसर्‍या दिवसअखेर बीड जिल्ह्यातील 12 पैकी 7 केंद्रावर 1404 क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. 5 तूर खरेदी केंद्राकडे शेतकर्‍यांनी पाठ फि रवल्याचे चित्र पहावयास मिळाले. आतापर्यंत 4 हजार शेतकर्‍यांनी नोंदणी केली असून त्यापैकी 110 शेतकर्‍यांनी तूर विक्री केली आहे.

राज्य शासनाने नाफे डच्या मार्फ त शासकीय हमीभावाने तूर खरेदीस सुरुवात केली आहे. बीड जिल्ह्यात 12 ठिकाणी तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. तीन दिवसांत 1404 क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. माजलगाव येथील केंद्रावर सर्वाधिक 1 हजार क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. केजमध्ये सर्वांत कमी 4 क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. 12 पैकी 7 केंद्रावर 110 शेतकर्‍यांना 1404 क्विंटल तुरीची विक्री केली आहे. परळीसह पाच केंद्रावर शेतकर्‍यांनी पाठ फि रवल्याचे चित्र पहावयास मिळाले. तूर खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांसाठी पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून शेतकर्‍यांनी तूर खरेदी केंद्रावर आणावी, असे आवाहन बाजार समित्यांकडून करण्यात आले आहे.