Fri, Feb 22, 2019 23:59होमपेज › Aurangabad › ‘भाजप नेते अंगावर आले तर शिंगावर घेऊ’

‘भाजप नेते अंगावर आले तर शिंगावर घेऊ’

Published On: Jan 20 2018 10:29AM | Last Updated: Jan 20 2018 10:29AMबदनापूर : प्रतिनिधी

भाजपचे नेते मागील काही दिवसांपासून शिवसेनेला आव्हान देत आहेत. अंगावर आले तर शिंगावर घेण्याचे शिवसेनेला चांगले माहिती आहे, असा इशारा शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिला.

येथील बाजार समिती येथे शिवसेना सदस्य नोंदणीचा प्रारंभ राज्यमंत्री अर्जून खोतकर यांचे हस्ते शुक्रवारी (दि. 19) करण्यात आला. खोतकर म्हणाले की, पक्षाने आदेश दिल्यास पण लोकसभा लढविण्यास तयार आहोत. बदनापूर विधानसभा हा शिवसेनेचा बालेकिल्‍ला असून तो परत मिळविण्यासाठी गावागावांत सदस्य नोंदणी सुरू करा, असे आवाहनही यावेळी खोतकर यांनी केले.

यावेळी भास्कर आंबेकर यांनी भाजपच्या नेत्यांचे भाषण अर्जुन खोतकरांचे नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नसल्याचे सांगून भाजपवाले काम कमी अन् प्रसिद्धी जास्त करतात, अशी टीका केली. माजी आमदार संतोष सांबरे मतदारसंघात पन्नास हजार शिवसेना कार्यकर्ता सदस्य नोंदणी करण्याचा संकल्प केला. यावेळी गावागावांत व घराघरांत शिवसेना कार्यकर्ते तयार करणार असल्याचे माजी आ. संतोष सांबरे म्हणाले. यावेळी भाऊसाहेब घुगे, किसान सेना जिल्हाप्रमुख भानुदास घुगे, जि. प. सदस्य कैलाश चव्हाण यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्तेमोठ्या संख्येने उपस्थित होते.