Tue, Jul 16, 2019 02:16होमपेज › Aurangabad › शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयात कचरा टाकला 

शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयात कचरा टाकला 

Published On: Jul 19 2018 3:09PM | Last Updated: Jul 19 2018 1:32PMऔरंगाबाद : पुढारी ऑनलाईन

दिवसेंदिवस औरंगाबाद कचरा प्रश्न वाढतच चालला आहे. भाजपकडून दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा अरोप करत शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयातच कचरा आणून टाकला आहे. यानंतर अधिकारी, आणि कर्मचाऱ्यांनी खिडक्या लावून घेत कार्यालयात बसून राहणे पसंद केले.

औरंगाबाद जिल्हाधिकारी नागपूरला गेले आहेत. ते सरकारचे प्रतिनिधी असून कायर्ालयातील अधिकारी काम करत नसल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केला आहे. भाजपचे महापौर असताना नारेगावला कचरा टाकू दिला. मात्र, आता शिवसेनेचे महापौर असताना कचरा टाकू दिला जात नाही. यामध्ये राजकारण केले जात आहे. आम्हाला कचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात नाही. दुसरीकडे सरकार मनपा बरखास्त करण्याची धमकी देत आहे. आता सरकारने याची जबाबदारी घ्यावी, असा असे शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे  म्हणाले.

शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयात टाकलेला कचरा फवारणी करुन उचलण्यात येत आहे. सध्या जिल्हाधिकारी नागपूरमध्ये असून ते दुपारपर्यंत शहरात येतील. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.