Sun, Feb 23, 2020 02:50होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : विधान परिषदेच्‍या निवडणुकीत अंबादास दानवे विजयी

विधान परिषद निवडणुकीत अंबादास दानवे विजयी

Published On: Aug 22 2019 10:03AM | Last Updated: Aug 22 2019 1:31PM

विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना भाजप युतीचे उमेदवार अंबादास दानवे विजयी झाले.औरंगाबाद: प्रतिनिधी 

विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना - भाजप युतीचे उमेदवार अंबादास दानवे विजयी झाले. काँग्रेस आघाडीचे भवानीदास उर्फ बाबुराव कुलकर्णी यांचा त्यांनी पराभव केला.

अंबादास दानवे यांना 524 मते मिळाली. तर काँग्रेस व राष्ट्रवादीची 100 वर मते फुटली. बाबुराव कुलकर्णी यांना 106 तर शहानवाज खान यांना 3 मते व 14 मते बाद झाली आहेत. 

बाबुराव कुलकर्णी म्हणाले की,  हा प्रामाणिकपणाचा पराभव आहे. तसेच मतमोजणीनंतर बाबुराव कुलकर्णी मतमोजणी केंद्रातून निघून गेले. अंबादास दानवे यांच्‍या विजयानंतर शिवसैनिकांचा जल्लोष केला. 

काँग्रेसला माजी जिल्हाध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार यांचा फटका बसला आहे. काँग्रेसची मते सांभाळून ठेवण्यात जिल्हाध्यक्ष अनिल पटेल आणि शहराध्यक्ष नामदेव पवार अपयशी ठरले आहेत.