Tue, Mar 26, 2019 07:39होमपेज › Aurangabad › जय जिजाऊ, जय शिवराय... जयघोषाने शहर दुमदुमले

जय जिजाऊ, जय शिवराय... जयघोषाने शहर दुमदुमले

Published On: Feb 17 2018 2:05AM | Last Updated: Feb 17 2018 12:49AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

‘तुमचं आमचं नातं काय... जय जिजाऊ जय शिवराय...’ जयघोषाने शुक्रवारी शहर दुमदुमून निघाले. मराठा क्रांती मोर्चातर्फे शिवजन्मोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या जनजागृती रॅलीमध्ये शिवप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. रॅलीमध्ये शिवरायांची प्रतिमा असलेले तीन रथ होते. प्रत्येक वाहनावर शिवध्वज लावण्यात आला होता.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राष्ट्रीय शिवजन्मोत्सवानिमित्त (19 फेबुवारी) शहरात जनजागृती आणि वातावरण निर्मितीसाठी भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सिडको येथील शिवछत्रपती महाविद्यालयापासून रॅलीस सुरुवात करण्यात आली. कामगार चौक, जयभवानीनगर, हनुमान नगर, पुंडलिक नगर, गजानन महाराज मंदिर, त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी, आकाशवाणी मार्गे मोंढा नाका, क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पैठणगेट, गुलमंडी, सिटी चौक, गांधी पुतळा, विभागीय आयुक्त कार्यालय, हडको कॉर्नर, टीव्ही सेंटर, एम-2, बळीराम पाटील विद्यालय, बजरंग चौक, आविष्कार चौक मार्गे कॅनॉट प्लेस येथे रॅलीचा राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला. उत्साही वातावरणात निघालेल्या रॅलीत शहराच्या सर्वच भागांतील शिवप्रेमी नागरिकांनी सहभाग घेतला. ज्या भागामध्ये वाहनफेरी गेली तेथील नागरिक फेरीमध्ये सहभागी होत होते. काही युवकांनी शरीरावर संदेश लिहिले, तर काहींनी देखावेही सादर केले होते. महिला, मुलींचा सहभागही लक्षणीय होता.