होमपेज › Aurangabad › अच्छे दिन हवे आहेत, तर भाजपाला धडा शिकवा : राजू शेट्टी

अच्छे दिन हवे आहेत, तर भाजपाला धडा शिकवा : राजू शेट्टी

Published On: May 05 2018 12:08PM | Last Updated: May 05 2018 12:07PMलोणी खुर्द : प्रदीप जाधव 

पंतप्रधान नरेंद्र मोदी नी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे  शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. नोटाबंदीने काळा पैसा बाहेर आलाच नाही. पण या निर्णयामुळे मालाचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांना या नोटाबंदीचा सर्वात जास्त फटका बसला. हे भाजपा सरकार शेतकरी विरोधी सरकार असून शेतकऱ्यांनी येत्या निवडणुकांमध्ये भाजपाला धडा शिकवावा असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी केले. वैजापूर येथे शेतकरी सन्मान अभियान अंतर्गत ‘मी आत्महत्या करणार नाही मी लढणार’ या कार्यक्रामात ते बोलत होते.

जीएसटीने शेतकऱ्यांचेच नुकसान झाले 

शेती औजारे, बियाणे, खते, कीटकनाशक, अश्या सर्वच वस्तूंवर जीएसटी लागू आहे. मात्र शेतकऱ्याने पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे. सरकारने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून ते पुन्हा कर्जबाजारी होऊ नये. तसेच उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार देण्यात यावा यासाठी संपूर्ण देशातील   शेतकरी संघटना एकत्र आल्या आहेत. सरकारने या मागण्या मान्य करण्यासाठी शेतकऱयांनी एकत्र येण्याचे आव्हान यावेळी राजू शेट्टी यांनी केले. 

नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी हिताचे निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.मात्र आज चार वर्षे उलटून देखील मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत नसून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच चालल्या आहे. त्या आत्महत्यांना सरकारच जबाबदार असून येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांत भाजपाला शेतकऱ्यांनी धडा शिकवावा असेही ते म्हणाले. 
भाजपा सरकार ने तूरडाळ आयात केल्याने शेतकऱ्यांच्या तुरीला कवडीमोल भाव मिळत आहे, तसेच पामतेल आयात केल्याने सोयाबीन, सुर्यफुल हे उत्पादन शेतकर्याना कवडीमोल भावाने विकावे लागत असल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत या आत्महत्याना सरकारच जबाबदार असून येत्या निवडणुकांत अच्छे दिन हवे असेल तर भाजपा ला धडा शिकवा असे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खाजदार राजू शेट्टी यांनी यावेळी केली.

भाजपचे लग्न शिवसेनेशी तर लफडं नारायण राणेंशी 

स्वाभिमानी पक्ष्याचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी ही भाजपाचा चांगलाच समाचार घेतला. भाजपाने आमच्याशी लग्न केले होते, त्यावेळी त्यांचे लफडे शिवसेनेशी होते त्यामुळे आम्ही घटस्फोट घेतला. आता लग्न शिवसेनेशी व लफडं नारायण राणेशी असून भाजप या दोघांनाही हात लावून देत नसल्याची जोरदार टीका रविकांत तुपकर यांनी केली.

Tags : Shetkari Swabhimani Sanghtana,Raju Shetti,Criticized, BJP,Acche Din,Ravikant Tupkar