Fri, Mar 22, 2019 01:27
    ब्रेकिंग    होमपेज › Aurangabad › व्हॉट्सअप कॉपी प्रकरण : शरदचंद्र पवार परीक्षा केंद्र रद्द

कॉपी प्रकरण : शरदचंद्र पवार परीक्षा केंद्र रद्द

Published On: Jan 22 2018 2:24PM | Last Updated: Jan 22 2018 2:42PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शहरातील सामूहिक कॉपी प्रकरणी शरदचंद्र पवार तंत्रनिकेतन महाविद्यालयाची  परिक्षाकेंद्र म्हणून असलेली मान्यता रद्द करण्यात येणार आहे. नोव्हेंबर २०१७ चे कॉपी प्रकरणामुळे ही मान्यता रद्द करण्यात येणार असल्याची माहिती औरंगाबाद प्रादेशिक तंत्रनिकेतन मंडळाचे उपसचिव डॉ. आनंद पवार यांनी दिली.

शैक्षणीक वर्ष २०१७-१८ ची परिक्षा नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आली होती. या परिक्षेमध्ये तंत्रनिकेतनच्या स्थापत्य शाखेच्या तिसऱ्या वर्षाच्या काँक्रिट टेक्नॉलॉजी या विषयाचा पेपर सुरू होता. या पेपरवेळी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून सामूहिक कॉपीचा प्रकार घडला होता. 

पेपर सुरू असताना मोबाईल कॅमेऱ्यात प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून बाहेरुन प्रश्नांची उत्तरे मागवण्यात येत होती. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले होते.