Tue, Jul 23, 2019 16:42होमपेज › Aurangabad › 400 वषार्र्ंनंतरही महोत्सव होणे हे शेक्सपिअरचे वेगळेपण : डॉ. पोतदार 

400 वषार्र्ंनंतरही महोत्सव होणे हे शेक्सपिअरचे वेगळेपण : डॉ. पोतदार 

Published On: Apr 24 2018 1:04AM | Last Updated: Apr 23 2018 1:18AMऔरंगाबाद : प्रतिनिधी 

शेक्सपिअरच्या मृत्यूला 400 वर्षे झाली तरी आज त्यांच्या नाटकांचा महोत्सव होतो. कालिदास आणि शेक्सपिअर हे प्रथमच 19 व्या शतकात अनुवादित झाले. संस्कृत नाटके लोककलांच्या फॉर्ममध्ये होती. नव्या लोकांनी या दोघांना आदर्श मानले. इंग्रजांनी या कलाकृतींचा अनुवाद करण्याचे ठरवले. अतिशय अभिजात अशी ही कला असल्याचे प्रतिपादन रंगभूमीचे अभ्यासक डॉ. आशुतोष पोतदार यांनी केले. गोविंदभाई ललित कला अकादमीच्या सभागृहात परिवर्तन संस्थेच्या वतीने आयोजित चौथ्या शेक्सपिअर महोत्सवात ते बोलत होते. समकालीन भारतीय रंगभूमीवर बोलताना डॉ. पोतदार म्हणाले, 19 व्या शतकात जात असताना त्या काळातही तुकाराम, ज्ञानेश्‍वर जवळचे वाटतात म्हणून ते दोन खांब आहेत. नाटक लिहिण्याची परंपरा मौखिक परंपरेतून आली आहे. मुळात जो सेवा करत होता तो व्यावसायिक काम करू लागला. दिग्दर्शकाला मास्तर म्हणत असत. चिंतामणरावानंतर प्रमाण भाषेतील नाटक सादर होऊ लागली. मराठी ही अशी भाषिक संकल्पना आहे. ती आपल्याला वेगवेगळ्या प्रांतात गेलेली दिसते. कालानुरूप भाषा बदलत गेली पाहिजे. नाटक रंगभूमी म्हणताना आपण कशाचा अभ्यास करणार आहोत, हा गुंता आपण हाताळला पाहिजे. आज नाटक प्रकाशित करायला धजत नाही, तर आशा नाटकांचा अभ्यास कसा करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

याप्रसंगी मुनिश शर्मा, अजित दळवी, भालचंद्र कानगो यांनी या महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. मुनिष शर्मा म्हणाले, महोत्सवाला श्रोत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. डॉ. सुनील देशपांडे म्हणाले, कार्यक्रमाच्या हा मोठा स्तुत्य उपक्रम आहे. आम्ही आमच्या महाविद्यालयात अशा प्रकारचे कार्यक्रम राबवत नसल्याची खंत त्यांनी व्यक्‍त केली. रामायण, महाभारत वाचत नसल्याने गळे काढण्याचे कारण नाही; पण ते काय वाचतात हे महत्त्वाचे आहे. शेक्सपिअर, कालिदास, तेंडुलकर, महेश एलकुंचलवर, प्रशांत पवार यांनी नाटक समृद्ध केले. यावेळी शेक्सपिअर यांच्या ‘हॅम्लेट’, ‘मॅक्बेथ’, ‘मर्चण्टस् ऑफ व्हेनीस’, ‘ज्युलिअस सीझर’ या नाटकांतील काही प्रसंगांचे सादरीकरण करण्यात आले. त्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सूत्रसंचालन श्रीकांत उमरीकर यांनी केले, तर मोहन फुले यांनी आभार मानले.

Tags : Aurangabad, Shakespeares, Festival, 400, years,  celebrations