Tue, Apr 23, 2019 23:42होमपेज › Aurangabad › महाराजाकडून विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण 

महाराजाकडून विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण 

Published On: Dec 19 2017 1:18AM | Last Updated: Dec 19 2017 12:51AM

बुकमार्क करा

पैठण : प्रतिनिधी

वारकरी शिक्षण संस्थेतील एका महाराजानेच 11 वर्षीय विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केल्याचा संतापजनक प्रकार पैठण तालुक्यातील वाघाडी येथे सोमवारी उघडकीस आला आहे. दरम्यान, याप्रकरणी महाराजाविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी संस्थेतील विद्यार्थी पैठण पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते. मुलाच्या पित्याच्या तक्रारीवरून या महाराजाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  गणेश लक्ष्मणराव तौर (रा. वाघाडी) असे आरोपी महाराजाचे नाव आहे.   

पोलिसांच्या माहितीनुसार पैठण तालुक्यातील वाघाडी शिवारातील नाथफार्म हाऊसवर रामेश्वर भगवान या नावाने वारकरी शिक्षण संस्था आहे. याठिकाणी शेजारच्या जिल्ह्यातील जवळपास 17 बालके वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेतात. याच संस्थेत तौर हा विद्यार्थ्यांना शिकवितो. रविवारी संस्थेला सुटी असल्याने सर्व मुले बाहेर खेळत होती. संधी साधून गणेश याने दुपारी एका 11 वर्षीय विद्यार्थ्यास अंग दाबण्याच्या बहाण्याने आपल्या रुममध्ये बोलावले. त्यानंतर रुमचा दरवाजा बंद करून या बालकावर लैगिंक अत्याचार केला. त्यानंतर पीडित मुलाने आरडाओरड केली तेव्हा इतर मुलांनी खिडकीतून डोकावले असता त्यांच्या हा प्रकार निदर्शनास आला.

दरम्यान, या घटनेची माहिती मुलांनी गावातील पालकांना दिली. सोमवारी पीडित मुलाचे पालकाने पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. दरम्यान, याप्रकरणी महाराजाविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी संस्थेतील विद्यार्थी पैठण पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते. त्यानंतर पोलिसांनी महाराजाविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती ठाणे अमलदार जानकीराम शेलार यांनी दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विलास दुसंगे करत आहेत. 

चोप देताच महाराजाने ठोकली धूम

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावातील नागरिकांनी ही संस्था गाठली. त्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी तौर महाराजाला चांगला चोप दिला, मात्र उपचारासाठी महाराजाला सरकारी दवाखान्यात नेले असता तेथूनच त्याने धूम ठोकली. वारकरी क्षेत्राला बदनाम करणार्‍या या महाराजाच्या विरोधात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.