होमपेज › Aurangabad › ज्येष्ठ वनस्पतिशास्त्रज्ञ गंगावणे यांचे निधन

ज्येष्ठ वनस्पतिशास्त्रज्ञ गंगावणे यांचे निधन

Published On: May 22 2018 1:24AM | Last Updated: May 22 2018 12:27AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभागाचे पाहिले प्रोफेसर इमेरिटस, माजी विभागप्रमुख, वनस्पती विकृतिशास्त्रज्ञ व ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्राप्त प्रोफेसर डॉ. ल. वि. गंगावणे (75) यांचे सोमवारी (दि.21) सकाळी आठ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले.

संशोधन करून वनस्पतिशास्र विभागाला आंतरराष्ट्रीय उंची प्राप्त करून देण्यामध्ये डॉ. ल. वि. गंगावणे यांचा सिंहाचा वाटा आहे. ब्रिटन, नेदरलँड, इजिप्त, सिंगापूर, मलेशिया, थायलंड या देशांमध्ये त्यांनी संशोधन पूर्ण केले. मानवाच्या शरीरातील कावीळ रोगाचे विषाणू तंबाखूच्या पानावर वाढवून त्याचा अधिक अभ्यास करता येऊ शकतो, हे संशोधन जगप्रसिद्ध ‘लॅनसेट’ जर्नलने स्वीकारले. डॉ गंगावणे भारतीय वनस्पती विकृतिशास्र संस्थेचे अध्यक्ष होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.