Mon, Nov 19, 2018 07:24होमपेज › Aurangabad › जेष्ठ वैज्ञानिक डॉ. ल. वि. गंगावणे यांचे निधन 

जेष्ठ वैज्ञानिक डॉ. ल. वि. गंगावणे यांचे निधन 

Published On: May 21 2018 4:03PM | Last Updated: May 21 2018 3:48PMऔरंगाबाद : पुढारी ऑनलाईन 

डॉ. बा. आं. म. विद्यापीठातील, वनस्पतीशास्त्र विभागाचे विद्यापीठाचे पाहिले प्रोफेसर इमेरिटस, माजी विभागप्रमुख डॉ. ल. वि. गंगावणे यांचे आज (२१ मे) सकाळी आठ वाजता प्रदीर्घ आजारपणामुळे निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. 

वनस्पतीशास्र विभागात अहोरात्र संशोधन करून विभागाला आंतरराष्ट्रीय उंची प्राप्त करून देण्यामध्ये डॉ. ल. वि. गंगावणे यांचा सिंहाचा वाटा आहे. ब्रिटन, नेदरलँड, इजिप्त, सिंगापूर, मलेशिया, थायलंड या देशामध्ये गंगावणे सरांनी आपले संशोधन पूर्ण केले होते. मानवाच्या शरीरातील कावीळ रोगाचे विषाणू तंबाखूच्या पानावर वाढवून त्याचा अधिक अभ्यास करता येऊ शकतो, हे त्यांचे संशोधन जगप्रसिद्ध 'लॅनसेट' जर्नल ने स्वीकारले.

राज्य शासनाचा 'आदर्श शिक्षक' पुरस्कार त्यांना मिळाला होता. भारतीय वनस्पती विकृतीशास्र संस्थेचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या पाठीमागे पत्नी, दोन मुले, सूना व नातवंडे असा परिवार आहे.