Fri, Feb 22, 2019 03:22होमपेज › Aurangabad › वह्या-पुस्तकांच्या सक्‍तीतून इंग्रजी शाळा मालामाल

वह्या-पुस्तकांच्या सक्‍तीतून इंग्रजी शाळा मालामाल

Published On: Apr 13 2018 1:53AM | Last Updated: Apr 13 2018 1:53AMऔरंगाबाद : भाग्यश्री जगताप

पूर्वी विद्यार्थ्याना दर्जेदार शिक्षण देऊन  सीबीएसई, आयसीएसई पॅर्टनच्या शाळा भरमसाट फीसच्या माध्यमातून पैसे कमवायचा. आता मात्र, भरमसाठ फीसबरोबरच विद्यार्थ्यांच्या वह्या-पुस्तके, गणवेशात कमिशन हाणत भरमसाट दलाली खाण्याचा धंदाच अनेक शाळांनी सुरू केला आहे. अमूक दुकानांमधूनच अमूक प्रकाशनाची पुस्तके, तमूक कंपनीच्या वह्या, रंग, पेन्सिल, कव्हर घेण्याची सक्‍ती हा या दलालीचाच एक भाग आहे. वह्या-पुस्तकांच्या बिलात 20 ते 40 टक्के कमिशनवर डल्ला मारत अशा शाळा दरवर्षी लाखो-करोडो रुपये कमवत असल्याचे दिसून येत आहे. 

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच सीबीएसई, आयसीएसई पॅटर्नच्या शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले. वह्या-पुस्तके खरेदी करण्यासाठी दुकानांत पालक व विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. दुकानात गेल्यावर दुकानदार पहिला प्रश्‍न कोणत्या वर्गाची पुस्तके असे विचारण्याऐवजी कोणत्या शाळेची पुस्तके असा प्रश्‍न विचारतो.  त्यानंतर कोणत्या वर्गाची असा प्रश्‍न केला जातो. त्यासाठी प्रत्येक पालकाकडे पाल्याच्या शाळेतून दिलेल्या याद्या आहेत. त्या यादीत वह्या-पुस्तकांची यादी व आकडेवारीचा समावेश आहे. शिवाय कोणत्या प्रकाशनाची पुस्तके द्यायची ही बाब देण्यात आली आहे. यादीप्रमाणे वह्या-पुस्तकांचा बंच, तसेच ठरलेले बिल तयार आहे. 

यामागील सर्व व्यवहाराची शहानिशा केल्यावर समोर आले की, ठराविक सीबीएसई व इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी विशिष्ट दुकानदारांकडूनच पुस्तके घेण्याची सक्‍ती पालकांना केली आहे. दुकानदारांकडून आमच्या शाळेतील 500 ते 600 विद्यार्थ्यांची पुस्तके पालक तुमच्याकडून खरेदी करतील, असे करार करून घेतले आहेत. 

Tags : Aurangabad, Schools, appear, earn, millions, crores, annually.