होमपेज › Aurangabad › नात जन्मली परदेशात; दीड क्‍विंटल पेढे वाटले

नात जन्मली परदेशात; दीड क्‍विंटल पेढे वाटले

Published On: Jan 22 2018 1:53AM | Last Updated: Jan 22 2018 1:53AMसावरगावघाट : प्रतिनिधी

सकाळी सकाळीच बँडचा सुमधूर आवाज घरोघरी दारासमोर रांगोळी श्री खंडेशर देवस्थाना समोर युवक, तरुण, महिला व जेष्ठ नागरिकांसह बच्चे कंपनीचा प्रचंड गर्दीतील उत्साह देवाला महाभिषक, कपडे आणि सर्वत्र आनंदी वातावरण  हे ऐकून व बघून कुणालाही एखादा सांस्कृतिक कार्यक्रम, विवाह वगैरे असेल असा भास होईल ! पण असं काही नव्हतं तर बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील कुसळंब येथील भूमिपुत्र योगीराज रामदास पवार यांना अमेरिकेत ‘नात’ झाली; नातीच्या जन्मोत्सवाचे स्वागत, आंनद सोहळा आपल्या मूळ गावात साजरा केला जात होता. योगीराज पवार हे मुंबईत कंपनीत नोकरी करतात. त्यांचा एक मुलगा अमेरिकेत स्थायिक आहे; तर दुसरी मुलगी मीनाक्षी व जावाई राहुल

गोडसे हे अमेरिकेत कॅलिफोर्निया येथे कंपनीत आहेत. अमेरिकेत योगीराज यांच्या मुलीला परवा मुलगी झाली; तिचे नाव ‘राशी’ ठेवण्यात आले आहे. आपल्याला नात झाली याचा मोठा आनंद आजोबांना झाला आणि त्यांनी आपले मूळ गाव कुसळंब येथे श्री क्षेत्र खंडेेशर देवस्थानला अभिषेक घातला, कपडे केले दीड क्विंटल पेढे गावभर वाटले. पायर्‍या गणीस पाचशे एक श्रीफळ फोडण्यात आले. भव्य मिरवणूक, बँड बाजा आणि सर्वत्र आंनदी उत्साह यामुळे आज नातीच्या जन्माचा एवढा आंनद व्यक्त करणार्‍या आजोबांच्या योगदानाचे सर्वत्र कौतुक झाले आणि एके काळी समाज व्यवस्थेत ‘नकोसी’ वाटणार्‍या मुलीच्या जन्माचे स्वागत करणार्‍या आजोबांना धन्यवाद दिले जात होते.

या वेळी मोहन रामदास पवार, शिवनाथ पवार, स. पो.नि.उगले, आधिकारी मिसाळ, अ‍ॅड. साबळे, ज्ञानेेशर जरांगे, बाळासाहेब पवार, आबासाहेब पवार, शिवदास पवार, एम. जे. पवार, नामदेव टेलर, प्रवीण इंगोले, गोकूळ पवार, गोरख पवार, नवनाथ पवार, किसाभाऊ पवार, गौतम पवार आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते. नात जन्मली परदेशात;

दीड क्‍विंटल पेढे वाटले गावात!

मुंबई, नगर आणि अंमळनेरमधून पेढे तब्बल दीड क्विंटल पेढे खरेदी करण्यासाठी ऑर्डर देण्यात आली होती. तीही मुंबई, नगर आणि अंमळनेर येथील पेढ्याच्या व्यापार्‍यांना. तेथून हे पेढे कुसळंब येथे आणण्यात आले होते. प्रत्येक पेढा पन्नास ग्रॅमचा तयार करण्यात आला होता.

मुलींना सन्मान देणे, त्यांना विकास प्रक्रियेत सामावून घेणे. हे प्रगत राष्ट्राचे लक्षण असते; हा सोहळा लक्षणीय होता. - मोहिनी पवार, सरपंच.

मुलगा व मुलगी हे समाज रथाची दोन चाके आहेत; त्याचा गौरव करणे कर्तव्यच आहे, ते आपण केले.  - योगीराज पवार, आजोबा.