Fri, Apr 19, 2019 07:59होमपेज › Aurangabad › सातारावासीय  पाणीटंचाईने त्रस्त, टँकर मिळेना 

सातारावासीय  पाणीटंचाईने त्रस्त, टँकर मिळेना 

Published On: Apr 17 2018 1:54AM | Last Updated: Apr 17 2018 12:54AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

हॅलो नमस्कार, टँकरवाले दादा बोलत आहात का? हो. दादा आम्ही सातारा परिसरातील छत्रपतीनगरात राहतो. आम्हाला दोन हजार लिटरचे टँकर पाहिजे. कधी पाहिजे, आज मिळाले तर चांगले होईल. घरात पाणीच नाही हो. माफी असावी; पण आज अशक्य आहे. पुढील दोन दिवस पाणी देता येणार नाही, कारण टँकर बुक झाले आहे. अहो एक्सट्रा रुपये घ्या; पण पाणी द्या. सॉरी, आपण आपले नाव व पत्ता एसएमएस करून द्या. दोन दिवसांनंतर टँकर पाठवतो. हा संवाद  ऐकायला येतो सातारा परिसरात. 

दोन वर्षांपूर्वी महानगरपालिकेत समावेश  होऊनही रस्ते, ड्रेनेजलाईन, लाईट या समस्या येथे कायम आहेत. समस्यांचे माहेरघर असलेल्या सातार्‍यातील बोअरची पाणी पातळी घटली आहे. मोटर सुरू केल्यावरही कमी दाबाने व  पाच-सात मिनिटे त्यातून पाणी येते. मोजून 20 लिटरच पाणी बोअरला येत आहे. तीव्र पाणीटंचाईला सामोेरे जावे लागत असल्याने नागरिकांचे जास्त हाल होत आहेत. व्यवसाय, नोकरी सोडून टँकरसाठी कामाच्या वेळासुद्धा बदलाव्या लागत असल्याचे पहावयास मिळत आहे.

Tags : Aurangabad, Satara, water, scarcity, stressed