Fri, Apr 26, 2019 18:17होमपेज › Aurangabad › अन् खासदार सचिन तेंडुलकरने हाती घेतली बॅट!

सचिन तेंडुलकरने पुन्हा बॅट हाती घेतली! (व्हिडिओ)

Published On: Dec 19 2017 2:08PM | Last Updated: Dec 19 2017 2:10PM

बुकमार्क करा

परंडा : शहाजी कोकाटे

दोन वर्षांपूर्वी भीषण दुष्काळाचा सामना करीत असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक सेलिब्रिटींनी काही उपक्रम राबविले. त्यात खासदार सचिन तेंडुलकरने देखील  जबाबदारी उचलली. सचिने खासदार निधीतून झालेल्या कामांची पाहणी करण्यासाठी आज डोंजा (ता. परंडा, जि. उस्मानाबाद) गावाचा दौरा केला. गावाची पाहणी केल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिनने हाती बॅट घेत गावकऱ्यासमावेत क्रिकेटचा आनंदही लुटला.

खासदार गाव दत्तक योजनेंतर्गत तेंडुलकरने डांजा गाव दत्तक घेतल्यानंतर गावात विकासकामे करण्याच्या सूचना दिली होती. ती कामे सध्या कोणत्या पातळीवर आहेत त्याची माहिती आज सचिनने घेतली. यावेळी गावासाठी बांधलेली पाण्याची टाकी, जिल्हा परिषद शाळेची नवीन इमारत तसेच सिमेंट रस्ता आदी विकासकामांचे उद्घाटन सचिनच्या हस्ते झाले. 

गावकऱ्यांनी भारतरत्न तेंडुलकर यांचे जोरदार स्वागत केले. पोलिस, महसूल प्रशासनातील बडे अधिकारी कालपासूनच दाखल झाले होते. 

Image may contain: 2 people, people standing and outdoor

Image may contain: 1 person, standing, walking, shoes, outdoor and text

Image may contain: 6 people, people smiling, people standing, beard and outdoor

Image may contain: 5 people, people smiling, sky, text and outdoor

 

 

Really looking forward to visiting Donja village today. pic.twitter.com/8HOb2eltCe

— sachin tendulkar (@sachin_rt) December 19, 2017