Wed, Jun 26, 2019 17:27होमपेज › Aurangabad › एसटी कर्मचार्‍याने परत केली रोख रक्‍कम

एसटी कर्मचार्‍याने परत केली रोख रक्‍कम

Published On: Dec 20 2017 1:38AM | Last Updated: Dec 20 2017 12:37AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

एसटी महामंडळात शिपाई पदावर असलेल्या नवनाथ बोडखे यांना रेल्वेत प्रवासादरम्यान शौचालयात सापडलेली रोख रक्‍कम आणि धनादेश संबंधित व्यक्‍तीचा शोध घेऊन त्याच्याकडे सुपूर्द केला आहे. 

बोडखे मंगळवारी (दि.19) पहाटे देवगिरी एक्स्प्रेसने कामानिमित्त परभणीला जात होते. सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांना रेल्वेतील शौचालयात एक पाकीट सापडले. याबाबत त्यांनी काही प्रवाशांना विचारणा केली, परंतु ते पाकीट स्वीकारण्यासाठी कोणीच पुढे आले नाही. अखेर त्यांनी पाकीटमधील कागदपत्रे व व्हिजिटिंग कार्डच्या आधाराने संबंधिताचा शोध घेतला. ते पाकीट संतोष शिंदे नावाच्या नांदेडमधील एका व्यावसायिकाचे असल्याचे समोर आले. दरम्यान, बोडखे परभणी येथे पोहचले होते. तेथून त्यांनी शिंदे यांच्याशी संपर्क साधून पाकीट आपल्याकडे असून त्यात काही कागदपत्रे, 20 हजारांचा चेक व रोख 9 हजार 270 रुपये असल्याची माहिती दिली. तेथील पोलिस कॉन्स्टेबल आपल्या परिचयाचे आहेत. त्यांना पाकीट द्या असे शिंदे यांनी बोडखे यांना सांगितले. यानंतर संबंधित पोलिसांना पाकीटातील एक हजार रुपये प्रामाणिकपणाबद्दल बोडखे यांना देण्याचे सांगितले.