Wed, Oct 16, 2019 20:23होमपेज › Aurangabad › दीडशे कोटींच्या रस्ते कामांना ग्रहण

दीडशे कोटींच्या रस्ते कामांना ग्रहण

Published On: Dec 24 2017 1:42AM | Last Updated: Dec 24 2017 1:02AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

सहा महिन्यांपासून सुरू असलेले दीडशे कोटी रुपयांच्या रस्त्यांचे गुर्‍हाळ आणखी लांबले आहे. एकूण निविदांपैकी केवळ दोनच ठेकेदार पात्र ठरल्याने महानगरपालिका प्रशासनाने आता या कामांच्या फेर निविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या निविदा मंगळवारी प्रसिद्ध होणार असून, निविदा भरण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्यात येणार आहे. 

राज्य शासनाने सिमेंट रस्त्यांसाठी मनपाला जून महिन्यात शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या शंभर कोटींसोबतच मनपाने स्वतःच्या निधीतून आणखी 50 कोटी रुपयांचे व्हाइट टॉपिंगचे रस्ते बनविण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे एकूण दीडशे कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा दोन महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झाल्या. पालिकेने या कामांचे सहा तुकडे करीत प्रत्येकी 25-25 कोटी रुपयांच्या सहा निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. ठेकेदारांनी या कामांसाठी 21 निविदा दाखल केल्या.

त्याची प्रशासनाने नुकतीच छाननी पूर्ण केली. पहिल्या टप्प्यात तांत्रिक बीडची, तर नंतर फायनान्सिएल बीडची तपासणी करण्यात आली. मात्र त्यात केवळ दोनच कंत्राटदार पात्र ठरले. त्यामुळे आता मनपा प्रशासनाने फेर निविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. मनपाच्या वतीने मंगळवारी या निविदा प्रसिद्ध करण्यात येणार असून पुढील पंधरा दिवस निविदा भरण्यासाठी देण्यात येणार आहेत.