Tue, Jul 16, 2019 11:45होमपेज › Aurangabad › मुख्याध्यापकांच्या खुर्चीलाच निवेदन

मुख्याध्यापकांच्या खुर्चीलाच निवेदन

Published On: Apr 25 2018 2:02AM | Last Updated: Apr 24 2018 11:52PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

पालक शिक्षक संघटना स्थापन केली असल्यास त्याबद्दल माहिती तसेच फी दरवाढ करताना अवलंबित करण्यात आलेल्या प्रक्रियेबाबत माहिती मिळावी. वह्या, पुस्तके, गणवेश तसेच कॅन्टीन सुविधा देण्याबाबत सक्ती कोणत्या धोरणान्वये करण्यात आली आहे याची माहिती मिळावी, यासंदर्भात संतप्त पालक मंगळवारी (दि.24) डॉ. वाय.एस. खेडकर स्कूलच्या मुख्याध्यापकांना निवेदन देण्यसाठी गेले, मात्र मुख्याध्यापक शाळेत उपस्थित नसल्याने त्यांच्या खुर्चीला निवेदन चिकटविण्यात आले. 

चिस्तिया चौक परिसरातील वाय.एस. खेडकर इंग्लिश स्कूल या शाळेने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून शालेय शुल्कात 15 टक्क्यांनी वाढ केली, मात्र ही शुल्कवाढ 15 टक्के नसून ती 30 टक्के असे पालकांचे म्हणणे आहे. निवेदनात म्हटले आहे की, आपल्या शाळेत प्रत्येक विद्यार्थ्यास जे कॅन्टीनचे जेवण घेण्यास बळजबरी केली जात आहे त्यास सर्व पालकांचा वविद्यार्थ्यांचा विरोध आहे.ज्या वह्या, पुस्तके, कपडे व इतर साहित्य विद्यार्थ्यांना फक्त शाळेतूनच घ्यायला लावले जात आहे ते अत्यंत महाग असून त्याच वह्या व पुस्तके बाजारात स्वस्त दरात मिळतात. ते शाळेतूनच घेण्याबाबत सक्‍ती कोणत्या कायद्या आधारे करण्यात आली आहे ? शाळेत पालक शिक्षक संघटना स्थापन केली आहे काय? असल्यास त्याच्या संदर्भात माहिती द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.

Tags :  Aurangabad, Request, Headmasters, chair