Fri, Jul 19, 2019 07:20होमपेज › Aurangabad › मनपा : बसचा राखीव निधी वर्ग करण्याची पालकमंत्र्यांना करणार विनंती

मनपा : बसचा राखीव निधी वर्ग करण्याची पालकमंत्र्यांना करणार विनंती

Published On: Jan 02 2018 12:58AM | Last Updated: Jan 02 2018 12:23AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

जिल्हा नियोजन समितीने इलेक्ट्रिक बसच्या खरेदीसाठी मनपाला 2 कोटी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. मात्र आता बसची खरेदी स्मार्ट सिटीतून होणार असल्याचे या निधीतून बसऐवजी ई रिक्षा खरेदी करण्याचे मनपाने निश्‍चित केले आहे. त्यासाठी हा निधी ई रिक्षाच्या खरेदीसाठी खर्च करू देण्याची विनंती पालकमंत्री रामदास कदम यांच्याकडे केली जाणार आहे.

मनपा आयुक्‍त दीपक मुगळीकर यांनी सोमवारी ही माहिती दिली. शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाल्यामुळे याच योजनेतून शहरात सिटी बस सेवा सुरू केली जाणार आहे. त्यास स्मार्ट सिटीच्या विशेष उद्देश वहन कंपनीने नुकतीच मंजुरी दिली आहे. प्रायोगिक तत्त्वावर 5 इलेक्ट्रिक बसेस खरेदी केल्या जाणार आहे. दुसरीकडे डीपीसीतून मनपाला इलेक्ट्रिक बससाठी याआधीच 2 कोटी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. त्यामुळे आता निधी बसऐवजी ई रिक्षासाठी वापरण्याचे मनपाने निश्‍चित केले आहे. 

या निधीतून कचरा गोळा करण्यासाठी बॅटरीवर धावणार्‍या इलेक्ट्रिक रिक्षा खरेदी करण्यात येणार आहेत. या निधीतून 132 रिक्षांची खरेदी शक्य होईल. परंतु त्यासाठी जिल्हा नियोजन समितीची मान्यता आवश्यक आहे. त्यासाठी पालकमंत्री रामदास कदम यांना विनंती करण्यात येईल. या 132 ई रिक्षा खरेदी केल्यास मनपाचा कचरा संकलनाचे काम अधिक सक्षमपणे होईल शिवाय प्रदूषणही होणार नाही, असेही मुगळीकर म्हणाले.

शहरात परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा पोलिस प्रयत्न करीत असतानाच ग्रामीण भागातही पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. पैठण तालुक्यातील चितेगाव, बिडकीन, आडूळ, पाचोडसह विविध ठिकाणी किरकोळ दगडफेकीच्या घटना घडल्या. पैठण मार्गावरील बसेस बंद करण्यात आल्या होत्या. यामुळे सायंकाळी बसने प्रवास करणारे सर्व प्रवासी अडकून पडले. यात काही विद्यार्थ्यांचाही समावेश होता.

आठ बस फोडल्या

या दगडफेकीचा फटका एसटी महामंडळाला बसला. औरंगाबाद विभागाची पुणे-पैठण या बसवर सनसवाडी (पुणे) येथे दगडफेक झाली. तसेच शहरातील कांचनवाडी भागात औरंगाबाद-नांदर, गेवराई तांड्याजवळ औरंगाबाद-पैठण, टाऊन हॉल येथे मलकापूर- औरंगाबाद व रावेर-पुणे या दोन बसवर दगडफे झाली. सिल्लोड येथे सिल्लोड-पाचोरा आणि कन्नड-सिल्लोड बस फोडण्यात आली. यात एक मुलगा जखमी झाला. तसेच डोंगरगाव फाटा येथे जळगाव-औरंगाबाद बसच्या काचा फोडण्यात आल्या.