होमपेज › Aurangabad › रेशनमधून ५५ रुपये किलोने मिळणार तुरडाळ 

रेशनमधून ५५ रुपये किलोने मिळणार तुरडाळ 

Published On: Dec 21 2017 1:54AM | Last Updated: Dec 21 2017 1:28AM

बुकमार्क करा

वैजापूर : प्रतिनिधी 

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गंत स्वस्त धान्य दुकानात तुरडाळ उपलब्ध करून देण्यात आली आहे. बाजारभावापेक्षा साधारणपणे 25 रुपये कमी दराने म्हणजेच 55 रुपये किलोने ही डाळ विक्री होणार आहे. सर्व प्रकारच्या शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी एकच किलो याप्रमाणे ही डाळ मिळणार आहे. दरम्यान तालुक्यातील 62 हजार 115 शिधापत्रिका धारकांसाठी 310 क्विंटल डाळीचे नियतन मंजूर करण्यात आले.

जिल्ह्यातील एकूण 9 तालुक्यातील 7 लाख 79 हजार 668 शिधापत्रिकाधारकांसाठी केवळ 3 हजार 754 क्विंटल डाळीचे नियतन जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी मंजूर केले आहे. मागील दोन वर्षांपूर्वी व्यापार्‍यांनी केलेल्या साठेबाजीमुळे तुरडाळीने 100 रुपये प्रती किलोचा टप्पा गाठला होता. त्यामुळे ऐन दिवाळी सणात नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर ओरड सुरू झाल्यावर पुरवठा विभागाने ठिकठिकाणी धाडी टाकून डाळीचे साठे जप्त केले होते. स्वस्तधान्य दुकानदाराला तुरडाळी विक्रीमागे प्रति किलो केवळ 70 पैसे इतके कमिशन दिले जाणार आहे.

तालुक्यातील 217 स्वस्तधान्य दुकानातील 62 हजार 115 शिधापत्रिकाधारकांसाठी 620 क्विंटल डाळची मागणी तहसीलदारांनी जिल्हा पुरवठा कार्यालयाकडे नोंदविली होती, मात्र मागणीपेक्षा अर्धीच म्हणजे 310 क्विंटल डाळीचे नियतन मंजूर करण्यात आले आहे.