Sun, May 26, 2019 15:02होमपेज › Aurangabad › दोन मामांकडून बलात्कार, १५ वर्षीय भाची गर्भवती

दोन मामांकडून बलात्कार, १५ वर्षीय भाची गर्भवती

Published On: May 24 2018 1:31AM | Last Updated: May 24 2018 12:13AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

वयाच्या सातव्या वर्षीच तिच्या पालकांना काळाने हिरावून घेतले. आई-वडिलांच्या जाण्याने पोरक्या झालेल्या चार लेकरांपैकी एकीचा सांभाळ आत्या करीत असताना वासनेने भरलेल्या या जगात आपले म्हणणार्‍यांनीच तिच्या अब्रुचे लचके तोडले. जिवे मारण्याची धमकी दिल्यामुळे गप्प बसलेली 15 वर्षीय अल्पवयीन पीडिता सात महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आल्यावर हा धक्‍कादायक उघड झाला.  या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून दूरच्या नात्यातील मामांविरुद्ध बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पॉक्सो) हर्सूल ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून गर्भ कोणाचा? याचा तपास करण्यासाठी डीएनए तपासणी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. 

कृष्णा प्रकाश पोपळघट (32, रा. जय भवानीनगर) असे एका आरोपीचे नाव असून तो मार्केटिंगचे काम करतो. दुसरा आरोपी 15 वर्षांचा असून दहावीत शिकतो. पोपळघट याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी सांगितले की, पीडितेच्या वडिलांचे सात वर्षांपूर्वी तर आईचे तीन वर्षांपूर्वी निधन झालेले आहे. तिला दोन बहिणी व एक भाऊ आहे. ते लहान असल्यामुळे आजी-आजोबांकडे राहतात. पीडिता पाच वर्षांपासून जाधववाडीत आत्याकडे राहते. आत्या मातीकाम करते. तर, पीडिता त्याच भागातील एका दवाखान्यात नर्स म्हणून कामाला आहे.

आईच्या नात्यातील दूरचा मामा याच भागात राहात असल्याने पीडितेचे त्याच्या घरी जाणे-येणे असायचे. ऑक्टोबर 2017 मध्ये ती तेथे गेली असता घरी अल्पवयीन आरोपी एकटाच होता. हीच संधी साधून त्याने पीडितेशी लगट करून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तेव्हा पीडिता रडत-रडत घरी गेली, मात्र तिने कोणालाही काहीच सांगितले नव्हते. 

रेल्वेखाली फेकण्याची धमकी

दरम्यान, ऑक्टोबर महिन्यातच दुसरा आरोपी कृष्णा पोपळघट याने आई-बाबाला भेटण्यासाठी म्हणून पीडितेला जय भवानीनगर येथील घरी नेले. घरी कोणीच नसल्यामुळे पीडितेने मामी कोठे आहे? अशी विचारणा केल्यावर भांडण करून ती माहेरी गेल्याचे त्याने सांगितले. तेव्हा पाण्यात गुंगीचे औषध मिसळून त्याने पीडितेला दिले. तिला गुंगी आल्यावर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने पीडितेला चार वेळा घरी नेऊन अत्याचार केला. पाचव्यांदा पीडितेने विरोध दर्शविल्यावर त्याने रेल्वेखाली फेकून देण्याची तसेच भावाला ठार मारण्याची धमकी दिली. 

डॉक्टरांच्या अहवालानंतर धक्‍का

पीडितेच्या पोटात दुखू लागल्यानंतर आत्याने तिला खासगी दवाखान्यात नेले. तेथील डॉक्टरांच्या अहवालानंतर पीडितेसह आत्याला धक्‍का बसला. डॉक्टरांनी पीडिता सात महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितल्यानंतर सर्व प्रकरण उघड झाले. दरम्यान, या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून दूरच्या नात्यातील या दोन्ही मामांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.