Thu, Jun 27, 2019 16:26होमपेज › Aurangabad › जिल्हाधिकारी कार्यालयातून भरदिवसा अपहरण 

मुंबई क्राईम ब्रँचच्या नावाने उकळली खंडणी

Published On: Dec 19 2017 1:18AM | Last Updated: Dec 19 2017 12:35AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

सिटी चौक ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करणारी खळबळजनक घटना 15 डिसेंबर रोजी भरदिवसा घडली. जिल्हाधिकारी कार्यालयापासून एकाचे अपहरण करून सोबत मुंबई क्राईम ब्रँचचे अधिकारी असल्याची थाप मारून एकाने चक्‍क 98 हजार रुपयांची खंडणी उकळली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून शेख मुश्ताक शेख मुनाफ (रा. रशीदपुरा) असे त्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहंमद अश्पाक मोहंमद सिद्दीकी (27, रा. शहाबाजार) हा फळविक्रीचा व्यवसाय करतो. तो 15 डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात गेला होता. तेथे त्याला आरोपी मुश्ताक भेटला. अफसर पठाण याच्याकडून घेतलेले प्लॉटचे एक लाख रुपये मुश्ताकला दिल्याचे सांगितले होते. त्यामुळे मुश्ताकनेच त्याचे अपहरण केले. अश्पाकला आरोपी मुश्ताकने गळ्यात हात घालून कारकडे नेले. कार जवळ जाताच बळजबरीने कारमध्ये बसविले. तेव्हा कारमध्ये एक चालक आणि अन्य दोघे आधीपासूनच बसलेले होते. 

ते अश्पाकला नारेगाव, नंतर जिन्सी भागात, तसेच अदालत रोडपर्यंत घेऊन आले. प्रवासात मुश्ताकसह सर्वांनी अश्पाकवर दबाव टाकला. मुश्ताकने हे मुंबई क्राईम ब्रँचचे पोलिस असून तुला मुंबईला घेऊन जातील. सुटका करण्यासाठी दोन लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यामुळे घाबरून अश्पाकने जवळ असलेले 68 हजार रुपये दिले. त्यानंतर भावाला फोन करून आणखी 30 हजार रुपये मागवले. निराला बाजार येथे ते पैसे आरोपींना दिले. त्यानंतर त्यांनी अश्पाकला सोडून दिले. 

आईची तब्येत बिघडली

98 हजार रुपये हाती पडल्यावर आरोपींनी अश्पाकची सुटका केली. त्यानंतर दोघे भाऊ घरी गेले. त्यांनी घडलेल्याची घटनेची माहिती घरी सांगितली. त्यानंतर त्यांच्या आईची तब्येत बिघडली. त्यामुळे पोलिसांत गुन्हा नोंदविण्याआधी ते आईला उपचारासाठी घेऊन गेले. 17 डिसेंबर रोजी आईची प्रकृती बरी झाल्यावर या प्रकरणात गुन्हा नोंद करण्यात आला. .