Tue, Oct 22, 2019 02:47होमपेज › Aurangabad › रेल्वेतून पडलेल्या तरुणासाठी ‘तिने’ रेल्वे थांबवली!

रेल्वेतून पडलेल्या तरुणासाठी ‘तिने’ रेल्वे थांबवली!

Published On: Jan 02 2018 9:48AM | Last Updated: Jan 02 2018 9:48AM

बुकमार्क करा
औरंगाबाद :  प्रतिनिधी

दारात बसून प्रवास करणार्‍या तरुणाचा तोल गेल्याने तो खाली पडला. त्याला वाचवण्यासाठी त्याच डब्यातून प्रवास करणार्‍या महिलेने चेन ओढून रेल्वे थांबवली. जखमी तरुणाला तत्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली. ही घटना सोमवारी दुपारी 12.30 वाजता करंजगाव रेल्वेस्टेशन दरम्यान घडली. मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेसने प्रवास करणारा दीपक बालासिंग राजपूत हा 25 वर्षीय तरुण दारात बसला होता. रोटेगाव-लासूरदरम्यान करंजगाव रेल्वेस्टेशनजवळ तोल गेल्यामुळे तरुण धावत्या रेल्वेतून कोसळला.

रेल्वे मागे घेण्यास भाग पाडले

केवळ चेन ओढून ती महिला शांत बसली नाही, तर गाडी थांबताच रेल्वे गार्ड व आरपीएफच्या जवानांना याची माहिती दिली, परंतु गार्ड व पोलिसांनी त्या महिलेवरच राग काढला. तरीही न डगमता तिने रेल्वे पाठीमागे घेण्याबाबत दम भरला. गार्डने सुमारे दोन किलोमीटर रेल्वे पाठीमागे घेऊन जखमी तरुणाला औरंगाबादेत आणले. दरम्यान, या घटनेची माहिती रेल्वे प्रवासी सेनेचे संतोष सोमाणी यांना कळताच त्यांनी रेल्वे स्टेशनवर 108 रुग्णवाहिकेस बोलावून घेत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली.


WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DEeePAgbWU94pj0zgYWo19