Sat, Feb 16, 2019 19:17होमपेज › Aurangabad › कर्जमाफीसाठी ते बसले चितेवरती

कर्जमाफीसाठी ते बसले चितेवरती

Published On: Dec 14 2017 11:12AM | Last Updated: Dec 14 2017 11:09AM

बुकमार्क करा

पूर्णाः प्रतिनिधी

तालुक्यातील पांगरा ढोणे येथील शेतकरी तुकाराम ढोणे आणि निळा येथील माणिकराव सूर्यवंशी या शेतकर्यांनी सरसकट कर्जमाफी करण्याच्या मागणीसाठी आगळ्यावेगळ्या प्रकारचे लक्षवेधी उपोषण 13 डिसेंबरपासून सुरू केले आहे. माणूस स्वर्गवासी झाल्यानंतर त्यास ज्या लाकडी सरणावर ठेवून भडाग्नी देवून अंतिम संस्कार केला जातो, त्याच प्रकारच्या सरणावर बसून त्यांनी बेमुदत उपोषणास बुधवारी आपल्याच शेतात सुरूवात केली.

ढोणे यांनी यापूर्वी दोन वेळा कोरड्या विहिरीत तर एकवेळ गोदावरी नदी पात्रात टोकर्यात बसून शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी उपोषण केले होते. त्यांच्या या जनहिताच्या मागणीस अजूनही न्याय न मिळाल्याने त्यांनी आता हे आंदोलनाचे नवे हत्यार उपसले आहे. 

पांगरा शिवारातील पूर्णा ते पांगरा गट क्रमांक 265 मध्ये शेंदरी बोंडअळीने बाधित झालेल्या कापूस पिकात उपोषण सुरू केले आहे. सध्या नागपूर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनातच आमच्या शेतकरी हिताच्या मागण्या मान्य करून तसा शासन निर्णय घ्यावा, अशी त्यांची मागणी आहे.