Wed, Nov 21, 2018 15:20होमपेज › Aurangabad › रोजाबागेत कुंटणखाना, आंटीला कोठडी

रोजाबागेत कुंटणखाना, आंटीला कोठडी

Published On: Dec 28 2017 1:34AM | Last Updated: Dec 28 2017 12:43AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

रोजाबागेतील अलअलीम हौसिंग सोसायटीत कुंटणखाना चालविणार्‍या एका आंटीला सिटी चौक पोलिसांनी अटक केली. तसेच, एका पीडितेची सुटका केली. सहायक पोलिस निरीक्षक शैलजा जानकर-दराडे यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी साडेचार वाजता ही कारवाई केली. 

फातेमा ऊर्फ शमाबेगम सय्यद शौकत (40) असे अटकेतील आंटीचे नाव आहे. बुधवारी तिला पोलिसांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. वाय. एच. मोहंमद यांच्यासमोर हजर केले. त्यांनी तिला 30 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोजाबाग येथील अलअलीम हौसिंग सोसायटीतील एका घरात कुंटणखाना सुरू असल्याची माहिती सिटी चौक पोलिसांना मिळाली. त्यानुसार, सहायक निरीक्षक शैलजा जानकर-दराडे यांच्या पथकाने पंचासमक्ष घरात छापा मारला. यावेळी आंटी फातेमा ही एका तरुणीकडून वेश्या व्यवसाय करून घेत असताना पकडण्यात आली. घटनास्थळावरून पोलिसांनी 16 हजार 800 रुपये रोकड, दोन मोबाइल असा मुद्देमाल जप्त केला. 

नोकर महिलेला करायला लावला वेश्या व्यवसाय 

तीन महिन्यांपूर्वी घरकामासाठी आलेल्या नोकर महिलेकडून आंटी फातेमा वेश्या व्यवसाय करून घेत होती. आर्थिक अडचणीत असलेल्या महिलेला हा व्यवसाय करण्यास भाग पाडण्याचे काम ती करीत असे. ग्राहकांकडून पाचशे रुपये घेतल्यानंतर आंटी स्वतःला दोनशे रुपये घेत असे व तीनशे रुपये महिलेला देत होती, असेही तपासात समोर आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.