Thu, Jan 17, 2019 16:22होमपेज › Aurangabad › प्रोझोन सेक्स रॅकेट : प्यायला लागते मिनरल वॉटर; दररोज दोन हजारांचा खर्च

थाई तरुणींना खायला लागतो पास्ता, नूडल्स

Published On: Dec 18 2017 2:28AM | Last Updated: Dec 17 2017 11:50PM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

प्रोझोन मॉलमधील स्पा सेंटरवर छापा मारून पोलिसांनी आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला, परंतु या प्रकरणाचा तपास काही केल्या पुढे सरकत नाही. व्यवस्थापक शशांक खन्नाने तोंड न उघडल्यामुळे पोलिस चिंतेत आहेत. आता तर थाई तरुणींना सांभाळताना पोलिसांच्या नाकीनऊ आले आहेत. त्यांना भारतीय खाद्य चालत नसल्यामुळे दोन वेळेस पास्ता आणि नूडल्स खाऊ खालावे लागत आहे. सोबतीला मिनरल वॉटरही द्यावे लागत असल्याने रोजचा खर्च दोन हजार रुपयांच्या घरात चालला आहे.

7 डिसेंबर रोजी उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांच्या विशेष पथकाने प्रोझोन मॉलमधील अनंतरा आणि डी स्ट्रेस हब या फॅमिली स्पा सेंटरवर छापा मारला. येथे चार ग्राहक, व्यवस्थापक आणि नऊ थाई तरुणींसह दोन स्थानिक तरुणींना पकडले होते. पोलिसांनी मोबाइल, लॅपटॉपसह जवळपास साडेआठ लाख रुपयांची रोकड असा साडेतेरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा नोंद केल्यानंतर तपास गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे आणि सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे करीत आहेत. 

चारही ग्राहकांना जामीन मंजूर झाला असून व्यवस्थापक शशांक खन्नाची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तसेच, थाई तरुणींना सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. दुभाषी नेमून त्यांचे जबाब नोंदविण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून गुन्हे शाखेने दुभाषीचा शोध घेतला आहे.

मुंबईच्या पथकाची झोळी रिकामीच

अनंतरा आणि डी स्ट्रेस हब या दोन्ही स्पा सेंटरचे मालक डेरेक मायडो, विशाल शेट्टी, फैजन शेख हे मुंबईचे रहिवासी आहेत. त्यांच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे एक पथक मुंबईला रवाना करण्यात आले होते, परंतु त्यांच्या हाती काहीही लागले नाही. विशेष म्हणजे, यापूर्वीही एमआयडीसी सिडको ठाण्याचे एक पथक असेच रिकामे परतले होते. आता पोलिसांनी थाई तरुणींच्या जाबाब नोंदणीलाच प्राधान्य दिले असून सोमवारपासून ही प्रक्रिया जोरदारपणे सुरू होणार आहे.