Tue, Jul 16, 2019 09:36होमपेज › Aurangabad › आठवले, प्रकाश आंबेडकरांच्या वक्‍तव्यांचा मराठा महासभेतर्फे निषेध

आठवले, प्रकाश आंबेडकरांच्या वक्‍तव्यांचा मराठा महासभेतर्फे निषेध

Published On: Jan 07 2018 2:01AM | Last Updated: Jan 07 2018 12:40AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी खासगी वृत्तवाहिन्यांना दिलेल्या वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये मराठा समाज आणि संघटनांच्या भावना दुखावणारे वक्‍तव्य केले आहे. तसेच त्यांच्या वक्‍तव्यामुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ शकते. त्यांच्या वक्‍तव्यांचा मराठा महासभेतर्फे निषेध नोंदवण्यात आला. 

संपूर्ण देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री असल्याचे भान आठवले यांनी असू द्यावे. विशेष म्हणजे आयुष्यभर दलित चळवळीतील कार्यकर्ता असलेले आठवले आज मात्र, संघाची भाषा बोलत असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. तसेच बहुजन समाजाचा पुरोगामी चेहरा म्हणून ओळख असलेले अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनीही घृणास्पद शब्दांत प्रतिक्रिया दिलेली आहे.

महाराष्ट्रात झालेल्या उद्रेकास हे दोन्ही नेते कारणीभूत असून त्यांच्यावर राज्य सरकारने तत्काळ कार्यवाही करावी. अन्यथा वेगळ्या शब्दांत या नेत्यांसह सरकारलाही जाब विचारला जाईल. तसेच मंगळवारी (दि. 9) याप्रकरणी आणि संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या समर्थनार्थ पत्रकार परिषद घेण्यात येणार असून सर्व मराठा संघटना व समविचारी संघटनांनी एकत्र येण्याचे आवाहन मराठा महासभेतर्फे रवींद्र काळे यांनी केले आहे.